Mumbai Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: एकटक पाहत अश्लील हावभाव अन् चाळे, तरुणीने तरुणाला जन्माची अद्दल घडवली; रेल्वे स्थानकावरच धूधू धुतला; पाहा VIDEO

Mumbai Viral Video: मुंबईतल्या गोवंडी रेल्वे स्थानकावर छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीने चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

Priya More

ummary -

  • अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाला तरुणीने धडा शिकवला

  • तरुणीने व्हिडीओ काढत तरुणाला चोप दिला

  • गोवंडी रेल्वे स्थानकावरील ही घटना

  • तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत असन तिचे कौतुक होत आहे

मुंबईमध्ये एका तरुणीने अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या गोवंडी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. एका फ्लॅटफॉर्मवर बसून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहणाऱ्या तरुणीकडे पाहून हा तरुण अश्लिल हातवारे आणि चाळे करत होता. या तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये या तरुणाच्या अश्लिल कृत्याचा व्हिडीओ शूट करून त्याला सर्वांच्या समोर धडा शिकवला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती पण आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेत आला आहे. नेटकरी या तरुणीच्या धाडसाचे खूपच कौतुक करत आहेत.

गोवंडी रेल्वे स्थानकावर एक तरुणी ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी याच रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्वर बसलेल्या तरुणाची या तरुणीवर नजर पडली. प्लॅटफॉर्मवर गर्दी असताना देखील हा तरुण या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. सतत तिच्याकडे तो पाहत होता आणि घाणेरडे चाळे करून दाखवत होता. तरुणी खूपच धाडसी होती त्यामुळे तिने सुरूवातीला या तरुणाचे घाणेरडं कृत्य आपल्या मोबाईलमध्ये शूट करण्यास सुरूवात केली. या तरुणीने तरुणाला धडा शिकवण्याचे ठरवले आणि ती थेट तो बसलल्या प्लॅटफॉर्मवर गेली. तिथे गेल्यानंतर तिने त्याला जाब विचारला तर त्याने आधी मी काहीच केले नसल्याचे सांगितले.

मग या तरुणीने 'तू काय केलं याचा व्हिडीओ दाखवून का? माझ्याकडे पाहून तू कशाप्रकारचे हावभाव करत होता हे तुला दाखवून का?' असं म्हणाली. हा तरुण या तरुणीचा रौद्रावतार पाहतच राहिला. मग काय मुलीने या तरुणाच्या सटासट कानाखाली मारण्यास सुरूवात केली. प्लॅटफॉर्मवर उपस्थित काही जण या तरुणीच्या मदतीला आले आणि त्यांनी देखील या तरुणाला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी या तरुणाला आपली चूक लक्षात आली. तो हात जोडून तरुणीची माफी मागायला लागला. या तरुणीच्या धाडसाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. या तरुणीने या तरुणाला असा धडा शिकवला ही आयुष्यात परत तो ही चूक करणार नाही.

जर प्रत्येक मुलींनी त्यांच्यासोबत असं वागणाऱ्या तरुणांना असा धडा शिकवला तर त्यांची पुन्हा कुठल्या मुलीची छेड काढण्याची हिंमत होणार नाही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तरुणीचे कौतुक करत 'अशाच रणरागिनींची गरज आहे महाराष्ट्राला' अशा कमेंट्स केल्या आहेत. 'ताई तू कमाल केली', 'वाह ताई तू खूपच भारी केलं', 'चांगला चोप दे ताई त्याला', 'आज मला या तरुणीवर गर्व होत आहे', 'ताई तुझ्यासारख्याच सर्व मुली बनल्या पाहिजेत.', अशा प्रकरच्या कमेंट्स करत नेटकरी या तरुणीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bandra-Worli sea link : २५० च्या स्पीडने पळवली लँबर्गिनी, मुंबईतील सी लिंकवरील व्हिडिओ

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT