Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump Case Saam Tv
मुंबई/पुणे

Ghatkopar Hording Case: 'होर्डिंग कोसळल्याची घटना 'देवाची करणी'', घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेचा अजब दावा; उच्च न्यायालयात याचिका!

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. १८ जुलै २०२४

काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये १७ निष्पाप लोकांचा बळी गेला. याप्रकरणी इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे याला अटक करण्यात आली होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून होर्डिंग पडणे हे दैवी कृत्य असल्याचा अजब दावा मुख्य आरोपी भावेश भिंडे याने केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईमधील घाटकोपर होर्डिंग प्रकरणात इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे याला अटक करण्यात आली होती. या अटकेविरोधात भावेश भिंडे याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेत रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्याने आपली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत जामीन देण्याची मागणी केली आहे.

"होर्डिंग पडणे हे दैवी कृत्य आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती होती, मला त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही, असं भावेश भिंडे याने दाखल केलेल्या याचिकमध्ये म्हटले आहे. तसेच या याचिकेमध्ये त्याने होर्डिंग बांधकामातील त्रुटींमुळे नव्हे तर त्या वेळी वाहणाऱ्या ९६ किमी प्रती तास वेगाच्या वाऱ्यांमुळे कोसळले असल्याचे म्हटले आहे.

तसेच मुंबईवर जोरदार वाऱ्यासह धुळीच्या वादळांचा अंदाज लावण्यात हवामान खात्याला अपयश आल्याचा दावाही त्याने या याचिकेत केला असून जामीन देण्याची तसेच एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, १३ मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेत तब्बल १७ जणांचा जीव गेला होता तर ७४ जण जखमी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT