Mumbai Ganesh Festival saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Ganeshotsav: मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती बंधनकारक

Ganesh Festival In Mumbai : यंदाचा गणेशोत्सवासाठी तयारी करणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेडून नियमावली जारी करण्यात आली आहे.

Chandrakant Jagtap

>> निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Mumbai Ganesh Festival: मुंबईतील गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. यंदाचा गणेशोत्सवासाठी तयारी करणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेडून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरी श्री गणेश मूर्ती पर्यावरणपूरक असणे बंधनकारक केले आहे.

मात्र मंडळाच्या मोठ्या मुर्त्यांबाबत हा निर्णय लागू नसेल. गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे आणि पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी महानगरपालिकेने प्रत्येक विभागात शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना एक जागा मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

याशिवाय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे असा महापालिकेचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून या मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणारी शाडूची माती काही प्रमाणात मोफत उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. (Breaking News)

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील महापालिकेने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी आकारले जाणारे शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

SCROLL FOR NEXT