Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांना बोलू द्या, ते बोलल्याने आमच्या जागा वाढणार आहेत; संजय राऊतांचा सणसणीत टोला

Sanjay Raut News : संजय राऊत नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे माध्यमांशी बोलत होते.

>>संजय सूर्यवंशी

Sanjay Raut on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलं होतं, त्यांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतलाय. फडवणीसाना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतायत. महाराष्ट्रात देखील सत्तापरिवर्तन असा सणसणती टोला राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे माध्यमांशी बोलत होते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आजपासून नांदेड दौऱ्यावर आहेत. देगलूर इथे गरुवारी ते दाखल झाले. यावेळी तेलंगणा सीमेवर शिवसैनिकांनी मोटारसायकल रॅली काढत त्यांचे जोरदार स्वागत केलं. यावेळी बँड बाजा आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल एक क्विंटल फुलांचा हार क्रेनच्या माध्यमातून राऊत यांना घालून नांदेडमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं.

Sanjay Raut
Shushma Andhare News: होय... मी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावली; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने जारी केला VIDEO

तसं बोलणं म्हणजे न्यायालयाचा अवमान - संजय राऊत

उद्धव ठाकरे गटांने सुप्रीम कोर्टात आठ मागण्या केल्या, पण कोर्टाने त्यातील एकही मागणी मान्य केली नाही असं वक्तव्य देवेंद्र फडवणीस यांनी केलंय. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी असं बोलणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यासारखं आहे असं म्हटलं आहे. (Latest Political News)

Sanjay Raut
Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबाबतचा निर्णय काही तासांत मागे, तहसीलदारांकडून जाहीर प्रगटण

त्यांचाच पोपट मेलाय - संजय राऊत

उद्धव ठाकरे यांचा पोपट मेलाय हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना त्यांचाच पोपट मेलाय असा पलटवार संजय राऊत यांनी केल आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com