Mumbai Ganesh Visarjan Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Ganesh Visarjan: गणेशभक्तांनो लक्ष असू द्या! रात्री ११ वाजता येणार समुद्राला भरती, बाप्पाचे विसर्जन करताना घ्या काळजी

Mumbai High Tide: समुद्रामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सव मंडळांनी रात्री ११ पूर्वी बाप्पाचे विसर्जन करावे.

Priya More

१० दिवस लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर आज गणेशभक्त बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईमध्ये घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. थाटामाटामध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. घरगुती गणपती बाप्पाचे तलावात किंवा नजीकच्या कृत्रिम तलावामध्ये त्याचसोबत समुद्रामध्ये विसर्जन केले जाते. त्याचसोबत मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन केले जाते. त्याचसोबत मुंबईतील जुहू चौपाटी, दादर चौपाटीवर देखील गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.

गणपती बाप्पाचे समुद्रामध्ये विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आज रात्री ११ वाजताच्या सुमारास समुद्राला भरती येणार आहे. या भरतीचा कालावधी जास्त काळ राहणार आहे. त्यामुळे या काळात समुद्रामध्ये जाणे धोक्याचे असल्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भरतीपूर्वीच अनेक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन केले जाण्याची शक्यता आहे.

लालबागचा राजासह अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी तराफ्यासोबत जातात. तर काही गणेशभक्त स्वत: बाप्पाची मुर्ती घेऊन खोल समुद्रात जाऊन किंवा बोटीने जाऊन गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. पण आज समुद्रात मोठी भरती येणार आहे. त्यामुळे त्यांनी रात्री समुद्रात जाणं टाळावे. रात्री ११ वाजण्यापूर्वीच त्यांनी गणपती बाप्पाचे विसर्जन करणे फायदेशीर ठरेल. तसंच, समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी जात असातना गणेश भक्तांनी काळजी घ्यावी कारण जेली फिश, स्टिंग रे या माशांचा वावर जास्त प्रमाणात आहे.

मुंबईतील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या आणि मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेशगल्लीच्या राजाची मिरवणूक सकाळी ९ च्या सुमारास निघाली. त्यानंतर आता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक नुकताच निघाली आहे. या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मिरवणुकीमध्ये गणेशभक्त नाचत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT