तब्बल १० दिवस पाहुणचार स्विकारल्यानंतर आज गणपत्ती बाप्पा परत जाणार आहे. आज अनंत चतुर्दशी असून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज १७ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशी असून आज सर्व गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे.
गणपती विसर्जन हे कोणी नदी, तलाव, सुमद्र किंवा कृत्रिम तलावात केलं जातं. सार्वजनिक गणपतीचं विसर्जन हे प्रामुख्याने मोठ्या तलावात किंवा समुद्रामध्ये करण्यात येतं. गणेश चतुर्थीच्या दिवशी जशी बाप्पाच्या मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते तसंच अनंत चतुर्दशीला पूर्ण विधिपूर्वक आणि योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन करणं महत्त्वाचं आहे. अशातच गणपती विसर्जनादरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे पाहूयात.
गणपती विसर्जन करण्यासाठी पहिल्यांदा गणपतीची आरती करा. यावेळी त्यांना नवैद्य दाखवा. या काळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबाबत माफी मागा
गणेश विसर्जनासाठी जाताना लक्षात ठेवा की बाप्पााच्या मूर्तीचं तोंड घराकडे असावं आणि त्याची पाठ घराबाहेर असावी. श्रीगणेशाच्या पाठीमागे गरिबी वास करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
अनंत चतुदर्शीचा शुभ मुहूर्त काय आहे हे पाहून घ्या. भद्रा काळ असताना गणपतीचं विसर्जन करू नये.
गणेश विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर गणपती बाप्पाला आसनावर आदरपूर्वक बसवावं. त्यावर अक्षता, हळद आणि कुंकू लावून तिलक लावावा. यावेळी दिवा लावा, अन्नदान करा, आरती करावी.
यावेळी बाप्पाला दाखवण्यात आलेला प्रसाद सर्वांना वाटावा. त्यानंतर गणपती विसर्जन करावं.
गणपती विसर्जन करताना बाप्पााच्या नावाचा जयजयकार करावा. त्यानंतर हळू हळू पाण्यामध्ये मूर्तीचं विसर्जन करावं.
विसर्जन करताना पाणी स्वच्छ आहे की नाही याची खात्री करून घ्या.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.