Cholesterol Control Diet: सावधान! वाढलेलं कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं; आजच आहारात करा 'हे' 5 बदल

Heart Health: ३० दिवसांत खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहार, ओमेगा-३, हेल्दी फॅट्स आणि रोज ३० मिनिटे चालण्याची सवय लावा. हे छोटे बदल हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Cholesterol Control Diet
Cholesterol Control Dietgoogle
Published On

सध्या लोक स्वत: च्या स्कीन केअरकडे खूप लक्ष देताना दिसतात. त्यासाठी चांगले महागातले प्रोडक्ट्स, औषधं आणि चांगला डाएट फॉलो करण्याचा ते प्रयत्न करतात. काही दिवसातच त्यांना चांगला परिणाम जाणवतो. तसंच जेव्हा तुम्हाला खराब कोलेस्ट्रॉल वाढताना दिसत असेल तर औषधांसोबत इतर काही गोष्टींची सवय लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. बऱ्याचदा लोक ही समस्या फक्त औषधांनी सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण तज्ज्ञांच्या मते कोणताही आजार फक्त औषधांनीच बरा होतो असं नाही. पुढे आपण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक चॅलेंज स्वीकारणार आहोत. हे एकूण ३० दिवसांचे असेल. याने तुमच्या ह्रदयाला बराचसा फायदा होतो.

मुळात कोणत्याही आजारापासून लांब राहण्यासाठी आहारात प्रोटीन आणि फायबर असणं आवश्यक असतं. त्यामुळे तुम्हाला जर कामानिमित्त बाहेर राहावं लागत असेल आणि बाहेरचे पदार्थ खावे लागत असतील तर, तुम्ही यावर लवकरच तोडगा काढला पाहिजे. तुम्ही वडापाव, समोसे घेण्याऐवजी एखादे फळ नक्कीच घेऊ शकता. अशाच प्रकारचे छोटे बदल तुम्हाला यामध्ये करायचे आहेत. याने कोलेस्ट्रॉल आणि हार्टच्या संबंधित समस्या तुम्हाला टाळता येतील.

Cholesterol Control Diet
How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या जेवणात फायबर (Soluble Fiber) असायला हवेत. हे फायबर पचनसंस्थेत जेलसारखा पदार्थ तयार करुन कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करतात. त्यामुळे दिवसाला ५ ते १० ग्रॅम फायबर घेणं महत्वाचं आहे. त्याने LDL खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्याची सुरुवात सकाळच्या नाश्त्यापासून करा. नाश्त्यात हार फायबर असलेले ओटमीलचा (Oatmeal)समावेश करा. तर दुपारच्या जेवणात राजमा, हरभरे किंवा डाळींचा समावेश करा.

तसेच फॅटी आणि सॅच्युरेटेड पदार्थांऐ्वजी इतर पदार्थ खा. त्यात अॅव्होकाडो, ऑलिव्ह ऑइलचा वापर आणि बदाम असे हेल्दी पदार्थ खा. त्यासोबत रोज सलग वेगाने ३० मिनिटे चाला. जेवल्यानंतर चालल्याने खूप फायदा होईल. मासे किंवा सगळ्या डाळी, टोफू हे पदार्थ सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतात. आठवड्यातून २ वेळेस मासे खा. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्सचे सेवन करा, जे तुम्हाला माश्यांमधून मिळेलच. त्यासोबत अळशीच्या बिया आणि रोज अक्रोड खा. हे आहारातले आणि जीवनशैलीतले बदल तुम्हाला नक्कीच ३० दिवसात कोलेस्ट्रॉलच्या समस्यांना कमी करतील. खराब कोलेस्ट्रॉल याने बाहेर पडू शकतं.

टीप: कोणतेही मोठे आहार किंवा जीवनशैलीतील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.

Cholesterol Control Diet
Acidity Relief Food: पित्ताचा त्रास वाढतोय? सकाळच्या नाश्त्यात घ्या हा १ पदार्थ, अ‍ॅसिडीटी होईल गायब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com