Vidyavihar Flyover: Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Flyover: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! नवीन उड्डाणपूल लवकरच होणार सुरू, कुणाला होणार फायदा?

Vidyavihar Flyover: मुंबईतल्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा नवीन उड्डाणपूल लवकरच सुरू होणार आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबरच्या सुरूवातीला उड्डाणपूल सेवेत येईल.

Priya More
  • मुंबईकरांसाठी गुड न्यूज

  • विद्याविहार उड्डाणपूल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार

  • विद्याविहार उड्डाणपुलामुळे वाहतूक होणार सुसाट

  • विद्याविहार पूर्ववरून पश्चिमेला जाणं होणार सोपं

मयूर राणे, मुंबई

मुंबईच्या बहुप्रतिक्षित विद्याविहार उड्डाणपुलाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. हा उड्डाणपूल ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा उड्डाणपूल ऑक्टोबरच्या सुरूवातीला वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे १७८ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेला हा चार पदरी उड्डाणपूल आहे.

विद्याविहार रेल्वे स्थानकावरून हा उड्डाणपूल जाणार असून तो पूर्वेला असणाऱ्या रामकृष्ण चेंबुरकर मार्ग आणि पश्चिमेला असलेल्या लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गाला जोडेल. पूर्व आणि पश्चिम विद्याविहार दरम्यान थेट जोडणी स्थापित करणे ही स्थानिक रहिवाशांची बऱ्याच काळापासूनची मागणी होती. अखेर या उड्डाणपुलामुळे पूर्वेकडून पश्चिमेला आणि पश्चिमेकडून पूर्वेला जाणं अधिक सोपं होणार आहे.

रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या या प्रकल्पातील मुख्य भागाची लांबी सुमारे 100 मीटर आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर विद्याविहार परिसरातील पूर्व-पश्चिम वाहतूक जोडणी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी संरचना वाहतुकीसाठी खुली करण्यापूर्वी आवश्यक ४५ दिवसांचे curing पूर्ण करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकल्पाला जवळपास दोन दशकांचा विलंब झाला आहे. रेल्वे भागाच्या डिझाइनचे काम २०१६ मध्ये करण्यात आले होते आणि २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र डिझाइनमधील बदल, कोविड-19 महामारी आणि अन्य अडचणींमुळे प्रकल्पाला विलंब झाला. या प्रकल्पाची याआधीची अंतिम मुदत ८ सप्टेंबर होती. आता ऑक्टोबरमध्ये पूल सुरू झाल्यास पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:राज्य सरकार २ दिवसात दुष्काळग्रस्तांसाठी GR काढणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Walking On Toes: रोज फक्त ५ मिनिटं टाचा वर उचलून चला; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Acidity : रात्रीच्या जेवणापूर्वी 'हा' पदार्थ खा, सकाळी ॲसिडीटी-जळजळ होणारच नाही

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाचे नवे नोटिफिकेशन जारी, मुंबईत महत्त्वाची बैठक

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT