Mumbai Metro One : मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक निर्णय! आता व्हॉट्सॲपवर मिनिटांत मिळणार पास; जाणून घ्या प्रोसेस

Mumbai Metro One Whatsapp Ticket : मुंबईकरांसाठी मोठी सुविधा! आता मुंबई मेट्रो वनचा डिजिटल पास व्हॉट्सॲपवरून खरेदी करता येणार आहे.
Mumbai Metro One WhatsApp Digital Metro Pass
Mumbai Metro One WhatsApp Digital Metro Pass AI Image
Published On
Summary
  • मुंबई मेट्रो वनने व्हॉट्सॲप आधारित डिजिटल मेट्रो पास सेवा

  • वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार

  • मेट्रो पास खरेदी करण्यासाठी तिकीट काउंटरव जाण्याची गरज नाही

  • डिजिटल पास मोबाइलमध्ये सेव्ह करता येणार

तुम्हाला माहिती आहे का? व्हॉट्सॲपचा वापर आता केवळ मेसेज आणि व्हिडिओ कॉलपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर तुम्ही डिजिटल पेमेंटपासून अगदी विविध सेवा घेण्यासाठीही व्हॉट्सॲपचा वापर करू शकता. अशातच आता मुंबईकरांसाठी व्हॉट्सॲपवर एक महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी व्हॉट्सॲप आधारित डिजिटल मेट्रो पास सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची सुविधा सुरू करणारी मुंबई मेट्रो वन ही देशातील पहिली मेट्रो सेवा ठरली आहे.

मुंबई मेट्रो वनच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे मेट्रो पास खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर जाण्याची किंवा प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच मेट्रो पास खरेदी करता येणार असून तो डिजिटल स्वरूपात सेव्ह करता येईल.

Mumbai Metro One WhatsApp Digital Metro Pass
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

व्हॉट्सॲपवरून काढलेला मेट्रो पास प्रवाशांच्या मोबाइलमध्येच सेव्ह राहणार असल्याने प्रवासाच्या वेळी तो सहज अॅक्सेस करता येईल. त्यामुळे पास हरवण्याची किंवा कागदी स्वरूपातील तिकीट सांभाळण्याची चिंता कमी होणार आहे. मुंबई मेट्रो वनने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपवरून खरेदी केलेला मेट्रो पास Google Wallet आणि Apple Walletमध्येही सेव्ह करता येणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः नियमितपणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

Mumbai Metro One WhatsApp Digital Metro Pass
Cancer Awareness : दररोज फक्त करा 'हा' एक व्यायाम कॅन्सर तुमच्यापासून राहील दूर; आजपासून करा सुरुवात

मुंबई मेट्रो वनच्या मते, ही सुविधा शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक डिजिटल आणि प्रवाशांसाठी सोयीची करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुंबईत डिजिटल सेवांचा विस्तार होत असताना मेट्रो प्रवासासाठी सुरू करण्यात आलेली ही व्हॉट्सॲप आधारित सुविधा प्रवाशांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com