Mumbai Metro : मुंबईमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या स्कूल बसजवळच मेट्रोचा स्लॅब कोसळला, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली

Mira Bhayandar metro slab collapse near school bus : मिरा भाईंदरच्या मिरा रोड परिसरात मेट्रोचा मोठा स्लॅब अचानक कोसळला. यावेळी खालून स्कूल बस जात होती. स्लॅब बसजवळ कोसळल्याने शाळकरी विद्यार्थी थोडक्यात बचावले.
Mira Bhayandar metro accident,
Mira Bhayandar metro accident,Saam TV
Published On

Mira Bhayandar metro accident : मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. या मेट्रोच्या कामांमुळे आधीच वाहनचालक आणि नागरिक वाहतूककोंडीचा त्रास सहन करत आहेत. त्यातच आता सुरक्षेच्या मुद्द्यावरून भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मिरा भाईंदर परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना अचानक मेट्रोचा एक मोठा स्लॅब खाली कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिरा रोड परिसरात ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी मेट्रोचा स्लॅब अचानक खाली कोसळला, त्याच वेळी खालून एक शाळकरी मुलांची बस जात होती. सुदैवाने हा स्लॅब स्कूल बसच्या अगदी जवळ पडल्यामुळे मोठा अपघात टळला आणि बसमधील शाळकरी विद्यार्थी थोडक्यात वाचले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा थरार याठिकाणी पाहायला मिळाला.

Mira Bhayandar metro accident,
कल्याणमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून लोखंडी रॉडने बेदम चोपले

भाईंदरच्या गोल्डन नेट परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणते जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांच्या तसेच वाहन चालकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती उपाययोजना नसल्यानं मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा हे काम चालू देणार नाही असे मनसेचे नेते संदीप राणे यांनी सांगितले आहे.

स्लॅब कोसळल्यानंतर रस्त्यावर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं. रस्त्यावर पडलेला मलबा बाजूला कऱण्याचे काम सुरू झाले आहे. मलबा खाली पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मिरा रोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमधून आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Mira Bhayandar metro accident,
'पंतप्रधान मोदींना भेटलो अन् चर्चा रंगल्या...'; NDA मध्ये जाणार की नाही? शरद पवारांनी बैठकीत स्पष्टच सांगितलं

मेट्रोच्या कामांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विशेष म्हणजे याआधीही ठाण्यातील माजिवडा परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना स्लॅब पडण्याच्या स्थितीत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता मिरा भाईंदरमध्ये थेट स्लॅबच खाली कोसळल्याने मेट्रोच्या निकृष्ट कामांवर आणि निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई आणि उपनगरांत मेट्रोचे काम करत असताना प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची ऐशीतैशी होत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com