Oshiwara Furniture Market Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फर्निचर मार्केटला भीषण आग, ५० ते ६० दुकानं जळून खाक; पाहा VIDEO

Oshiwara Furniture Market Fire: ओशिवरा फर्निचर मार्केटला आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये ५० ते ६० दुकानं जळून खाक झाली असून मोठं नुकसान झालं आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईच्या ओशिवरा परिसरात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली. या आगीमध्ये ५० ते ६० दुकाने जळून खाक झाली आहेत. लाकडाची दुकानं असल्यामुळे आग वाढत चालली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या परिसरामध्ये सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा फर्निचर मार्केटला आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. या आगीमध्ये आतापर्यंत मार्केटमधील ५० ते ६० दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे.

आग लागल्यानंतर घटनास्थळावर सिलेंडरचा देखील स्फोट झाला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. सध्या या परिसरामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. आग लागताच फर्निचर मार्केटमध्ये काम करणाऱ्या कामगारांन दुकानाबाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या आगीमध्ये फर्निचर मार्केटमधील अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT