Furniture Cleaning : दिवाळीला घरातील लाकडी फर्निचर अगदी नव्यासारखं चमकेल; फक्त किचनमधील या गोष्टींनी करा सफाई

Wooden Furniture Cleaning Hacks : किचनमधील काही निवडक गोष्टींनी घरातील फर्निचर नवं करता येतं. ते कसं याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Furniture Cleaning
Furniture Cleaning Saam TV
Published On

दिवाळी म्हटलं की घरोघर साफसफाई करण्यास सुरुवात होते. वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने दिवाळी सुरू होण्याआधी प्रत्येक व्यक्ती घर स्वच्छ करतात. साफसफाईच्या कामांमध्ये किचनमधील भांड्यांपासून ते घरातील फर्निचरपर्यंत प्रत्येक वस्तू स्वच्छ केली जाते. आता लाकडी फर्निचर घरच्याघरी साफ करणे अनेक व्यक्तींना कठीण वाटते. मात्र काही सिंपल टिप्सने घरतील फर्निचर स्वच्छ करणे सहज सोपं आहे. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

Furniture Cleaning
Wooden Furniture Care : घरातल्या लाकडी फर्निचरची अशी घ्या काळजी, वाळवीपासून राहिल दूर

सँडपेपरचा वापर

लाकडी फर्निचर साफ करण्यासाठी तुम्ही सँडपेपरचा वापर करू शकता. सँडपेपर एका बाजूने प्लेन आणि दुसऱ्या बाजून खरखरीत असतो. त्यामुळे याता वापर तुम्ही लाकडी वस्तूंची चकाकी वाढवण्यासाठी करू शकता. लाकडी वस्तूंवर असलेली धूळ आणि माती साफ करण्यासाठी तुम्ही या सँडपेपरचा वापर करू शकता. त्यासाठी सँडपेपर खरखरीत बाजूने लाकडावर घासून घ्या. असे करताच लाडकी वस्तूंवरील धूळ कमी होण्यास सुरुवात होईल.

मस्टर्ड ऑइल आणि लिंबाचा रस

तुम्ही मस्टर्ड ऑइल आणि लिंबाचा रस सुद्धा एकत्र करू शकता. मस्टर्ड ऑइल आणि लिंबाचा रस एकत्र करून घेतल्यावर एका ब्रशच्या सहाय्याने फर्निचरवर फिरवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कापडाने फर्निचर घासून घ्या. हा उपाय केल्याने फर्निचर अगदी नव्यासारखं चमकू लगतं.

व्हाइट व्हिनेगर

क्लिनींग हॅक्समध्ये तुम्ही व्हाइट व्हिनेगर सुद्धा वापरू शकता. व्हाइट व्हिनेगर फर्निचर साफ करण्यासाठी फार चांगलं आहे. यासाठी एक कप पाणी घ्या. पाण्यात व्हिनेगर मिक्स करा. हे पाणी एका स्प्रे असलेल्या बॉटलमध्ये भरून घ्या. त्यानंतर फर्निचरवर या बॉटलने स्प्रे करा. तसेच सुती कापडाने पुसून घ्या. अशा पद्धतीने तुमच्या फर्निचरमध्ये छान चमक येईल.

Furniture Cleaning
BMC Street Furniture Scam: मुंबई महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्तांमार्फत चौकशी करा, आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com