Navratri Home Cleaning Tips : अजूनही नवरात्रीसाठी घराची साफसफाई झाली नाही;अशा पद्धतीने झटपट करा क्लिनींग

What are the 7 basic cleaning? : नवरात्रीमध्ये कमी वेळात घर साफ करण्यासाठी आम्ही काही सिंपल टिप्स शोधल्या आहेत.
What are the 7 basic cleaning?
Navratri Home Cleaning TipsSaam TV
Published On

आज घरोघरी घटस्थापना झाल्यानंतर ११ ऑक्टोबरपर्यंत देवीची पुजा केली जाणार आहे. घरी सणउत्सव असल्यास त्या आधी घराची साफसफाई करणे महत्वाचे असते. त्यासाठी घरात प्रत्येकाला काम करावे लागते. घर साफ करणे सोपं काम नाही. तसेच कामाच्या व्यापामुळे अनेक महिलांना सतत घराची साफसफाई करणे कठीण असते.

What are the 7 basic cleaning?
Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

अशात आज देवीची स्थापना होणार आहे. मात्र अजूनही तुम्ही घर साफ केलं नसेल तर आज आम्ही तुम्हाला कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये घर कसं स्वच्छ करायचं याची माहिती सांगणार आहोत. या सिंपल टिप्सने तुम्ही कमीवेळात झटपट घराची साफसफाई करू शकता.

कानाकोपऱ्यात स्वच्छता

रोजच्या दिवसात आपण कानाकोपऱ्यात स्वच्छता करत नाही. प्रत्येक घराला चार भिंती आणि त्यामुळे चार कोपरे असतात. त्यामुळे आता घर साफ करताना सर्वात आधी एक मोठा मॉप किंवा झाडू घ्या आणि घरातील कानाकोपरा स्वच्छ करून घ्या. या ठिकाणी घरामध्ये सर्वात जास्त धूळ जमा होते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा.

मंदिर स्वच्छ करा

अन्य काही साफसफाई करण्याऐवजी तुम्ही थेट मंदिर साफ करण्यास सुरुवात केली पाहिजे. घरातील मंदिर साफ करताना सर्वात आधी सर्व मूर्ती बाहेर काढून घ्या आणि गरम पाण्यात ठेवा. मूर्ती गरम पाण्याने धुतल्यावर मंदिरात धुळ असल्यास छोट्या लक्ष्मी झाडूने ते क्लिन करा आणि एक कापड ओलं करून मंदिर पुसून घ्या. त्यानंतर पुढे मंदिर सुकल्यावर मूर्ती पुन्हा त्यात लावून ठेवा.

किचन साफ करा

नवरात्रीत साफसफाईसाठी आणखी महत्वाचं ठिकाण म्हणजे किचन. किचन व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. कारण नऊ दिवस आपण रोज नवीन आणि बरेच पदार्थ बनवतो. त्यामुळे किचन क्लिन असणे महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही आता किचनमधील भांडी साफ करणे तसेच येथे असलेली धूळ स्वच्छ करणे महत्वाचं आहे.

What are the 7 basic cleaning?
Navratri Ghagra Choli : नवरात्रोत्सवासाठी सुंदर घागरा ड्रेस डिझाइन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com