Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवरात्री सण

भारतात विविध सण समारंभ नेहमीच होत असतात. नुकतेच गणपती विसर्जन झाले. आता येणारा सण म्हणजे नवरात्री.

navratri festival | saam tv

नैवेद्याला काय बनवायचं?

प्रत्येक गृहिणी उपवासाला आणि नैवेद्याला काय बनवायचं हा विचार करत असतील. त्यांच्यासाठी एक खास आणि अगदी झटपट तयार होणारी रेसीपी आम्ही शोधली आहे.

naivedya navratri | Google

बटाट्यापासून नैवेद्य?

आपण नेहमीच साबुदाणा किंवा तांदळापासुन उपवासाचे पदार्थ तयार करतो. आता आपण आपण बटाट्यापासून उपवासाचा पदार्थ तयार करणार आहोत.

botato naivedya recipe | canva

साहित्य

२ उकडलेल्या बटाट्यांचा किस, २ कप तूप, २ कप दूध, २ कप साखर, आवडीनुसार काजू आणि बदाम.

ingredients | saam tv

कृती

सर्वप्रथम गॅस ऑन करा. त्यावर एक जाड बूड असलेला भांड किंवा कढई ठेवा. कढई व्यवस्थित तापू द्या. आता त्यात तूप घाला. ते व्यवस्थित विरघळू द्या.

potato halwa | canva

सोप्पी पद्धत

तुपात आपा कापलेल्या बटाट्याचा कीस घाला आणि बटाटा व्यवस्थित परतून घ्या. आता त्यात दुध घालून परत बटाटा व्यवस्थित परतून घ्या. शेवटी त्यात साखर घाला.

sheera | canva

तयार शिरा

साखर आणि ड्रायफूट त्यात घालून छान परतून घ्या. आणि गॅस बंद करून त्यावर ५ मिनिटे झाकन ठेवा. तयार झाला सोप्पा आणि झटपट बटाट्याचा शिरा.

potato sheera | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

sheera | canva

NEXT : येथे क्लिक करा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

naivedya | saam tv
NEXT :नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?