Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवरात्री

नवरात्रीचा हा सण ३ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या दिवसांत दुर्गा मातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

navaratri | canva

दुर्गा माता

नवरात्रीमध्ये लोक दुर्गा मातेला वेगवेगळे नैवेद्य अर्पण करतात. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्मांडाची पूजा केली जाते. ही देवी शक्तीचे प्रतिक म्हणून मानतात.

durga mata | canva

देवीचा नैवेद्य

या चौथ्या दिवशी देवी कृष्मांडाला मालपूवाचा नैवेद्य देणे खूप शुभ मानलं जातं. देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घरगुती पद्धतीने मालपूवा बनवू शकता.

नैवेद्य | canva

साहित्य

गव्हाचे पीठ, रवा, मावा, दूध, साखर, साजूक तूप,काजू, पिस्ता, केशर, इलायची,बडीशेप पावडर इ.

Ingredients | canva

कृती

प्रथम एक भांड घेवून त्यात गव्हाचे पीठ आणि रवा टाकून चांगल मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात साखर, वेलची आणि बडीशेप पावडर टाका. हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करुन त्यात मावा टाकून पुन्हा चांगले मिक्स करा.

makeing | canva

मिश्रण

मिक्स केलेल्या मिश्रणात दूध घालून त्या मिश्रणाला जास्त जाड किंवा पातळ करु नका. त्यानंतर दुसरीकडे साखरेचा पाक तयार करुन त्यात वेलची पावडर टाका. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तूप टाका.

makeing | canva

मालपूवा

तूप गरम झाल्यानंतर त्यात मालपुवा तयार करायला सुरुवात करा. दोन्ही बाजूंनी मालपूवाला सोनेरी भाजून घ्या. यानंतर मालपूवाला साखरेच्या पाकात टाका. नंतर त्यावर काजू-पिस्ताचे तुकडे घालून सर्व्ह करा.

maal poova | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

टीप | canva

NEXT: कच्ची पपई खाण्याचे आश्चर्यकारक फायदे!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Papaya | Saam Tv
येथे क्लिक करा...