कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

Kim Jong Un Missile Test East Asia War Fears: इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असतानाच जगात महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. अशातच आता उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या लहरीपणामुळे जगावर आणखी एक संकट गडद झालंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
North Korea launches multiple ballistic missiles toward the Sea of Japan, escalating tensions with Japan and South Korea.
North Korea launches multiple ballistic missiles toward the Sea of Japan, escalating tensions with Japan and South Korea.saam tv
Published On

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असतानाच जगात महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. कारण उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने एक-दोन नव्हे तर जपानच्या दिशेनं समुद्रात सलग 10 बॅलिस्टिक मिसाईल्सचा जोरदार मारा केलाय. त्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियाला चांगलीच धडकी भरलीय.

उत्तर कोरियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दक्षिण कोरिया आणि जपानने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. एव्हढंच नाही तर जपानने आपलं नौदलला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र यामुळे जपानच्या समुद्रात तणाव वाढलाय.

मुळात याला अमेरिका जबाबदार आहे....इराणसोबत युद्ध सुरू असताना अमेरिकेनं दक्षिण कोरियासोबत जपानच्या समुद्रात आपला युद्ध सराव केलाय. त्यामुळे चवताळलेल्या किम जोंग उननं या सरावादरम्यानच थेट समुद्रात १० क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे पूर्व आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीये. मात्र, हा हल्ला नसून मिसाईल टेस्टिंग सुरू असल्याचा दावा उत्तर कोरियानं केलाय. असं असलं तरी अमेरिकेला खुलं आव्हान देणाऱ्या उत्तर कोरियाची लष्करी ताकद किती आहे पाहूयात.

उत्तर कोरियाच्या लष्करात साधारण १३ लाख सैनिक आहेत. उत्तर कोरियाकडे 'ह्वासोंग-१७' आणि 'ह्वासोंग-१८' सारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं आहेत. त्यात बहुतांश बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे ही अण्वस्रधारी आहेत. किम जोंग यांच्या उत्तर कोरियाकडे ४० ते ६० अण्वस्त्रे आहेत. तसंच उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणीही केलीय.

जगात सध्या युक्रेन-रशिया, अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरूयं. त्यात आता दक्षिण कोरिया-जपान विरुद्ध उत्तर कोरिया यांच्यात युद्ध पेटण्याची शक्यताय. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन लहरी असल्यामुळे कधीही हे युद्ध पेटू शकतं. त्य़ामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com