Mumbai-Ahemdabad Bullet Train: मुंबई ते अहमदाबादचा प्रवास फक्त ३ तासात! कधी पूर्ण होणार बुलेट ट्रेनचे काम, किती असतील थांबे?

Mumbai-Ahemdabad Bullet Train Project Update: भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प प्रगतीपथावर आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान या ट्रेनचा वेग वाढलाय. बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे.
Mumbai-Ahemdabad Bullet Train
Mumbai-Ahemdabad Bullet Train Project Update
Published On

देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम जोरात सुरू आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबादचा प्रवास जलद होणार आहे. तीन तासात या दोन्ही शहरांचा प्रवास पूर्ण होणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम गुजरातमध्ये जवळपास पूर्ण झालंय. बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे आणि ते कधी पूर्ण होणार हे जाणून घेऊ?

Mumbai-Ahemdabad Bullet Train
Credit Card CVV: क्रेडिट कार्डवरील CVV नंबर काय असतो? 'या' नंबरमुळेच कसा सुरक्षित राहतो तुमचा पैसा?

बुलेट ट्रेनचे बजेट

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग 508 किलोमीटरचा आहे. हा मार्ग तयार करण्यासाठी 1.1 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नॅशनल हाय स्पीड कैल कॉर्पोरेशन (NHSRCL) ने या प्रकल्पाची जबाबदारी घेतलीय. 14 सप्टेंबर 2017 रोजी जपान आणि भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलीय. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन 12 स्थानकांवर थांबणार आहे.

या यादीत मुंबई, ठाणे, विरार, बायसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या शहरांचा समावेश आहे. सध्या अहमदाबाद ते मुंबई प्रवास करण्यासाठी 7-8 तास लागतात. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 3तासांत पूर्ण करता येणार आहे.

Mumbai-Ahemdabad Bullet Train
Vande Bharat train: ९ वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार, काय आहे मेगाप्लान?

बुलेट ट्रेनचे किती काम झाले पूर्ण?

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 11 जानेवारी 2025 पर्यंत, 253 किमी मार्ग, 290 किमी गर्डर टाकणे आणि 358 किमी घाटाचे काम पूर्ण झाले आहे. 13 नद्यांवर 5 स्टील पूल बांधण्यात आले आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बीकेसी ते ठाणे दरम्यान 21 किलोमीटरचा बोगदा बांधला जात आहे. त्यात 7 पर्वतीय बोगद्यांचाही समावेश आहे, त्यापैकी 1 बोगदा बांधण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलेट ट्रेनचे काम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या उद्घाटनाची औपचारिक तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आलीय. अशा परिस्थितीत, त्याची चाचणी 2026 मध्येच पूर्ण होईल, त्यानंतर 2029 पर्यंत ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com