Mumbai NESCO Drug Party Case Update Video Saam
मुंबई/पुणे

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Mumbai NESCO Drug Party Case Update: मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पार्टी झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेत्रीला अटक करण्यात आली.

Priya More

Summary -

  • नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई

  • बॉलिवूडच्या अभिनेत्रीला अटक

  • ड्रग्ज रॅकेटशी आर्थिक संबंध उघड

  • आतापर्यंत ११ आरोपी पोलिसांनी केली अटक

संजय गडदे, मुंबई

गोरेगाव नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी बॉलिवूडच्या अभिनेत्रीला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी जिया रेवळ प्रदीप जेकब (वय ३३ वर्षे) या अभिनेत्रीला बेड्या ठोकल्या. ती फिल्म इंडस्ट्रीत साईड एक्टर म्हणून काम करते. तिने ड्रग्ज पुरवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटकेनंतर तिला बोरीवली येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने तिची रवानगी पोलिस कोठडीत केली.

नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासातून उघड झालेली धक्कादायक बाब म्हणजे जिया ही ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीच्या संपर्कात होती. ड्रग्ज पेमेन्ट तिच्या बँक खात्यातून होत असल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नसल्याचा दावा असला तरी तिने तस्करांना आर्थिक मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून आनंद लक्ष्मण पटेल, विनीत सुनील गीरलानी, आयुष विकी साहू आणि शुभ रामलखन अग्रवाल हे जियाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौघांच्या बँक खात्यांची तपासणी केल्यानंतर जियाच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आनंदने ६४००० रुपये, विनीतने २२,५०० रुपये, शुभने १ लाख ६६ हजार ४०० रुपये आणि आयुषने १ लाख ८४ हजार ६०० रुपये जियाच्या खात्यात जमा केले होते. या व्यवहारांमुळेच जियाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी मार्क उर्फ महेश खेमलानी याच्या सांगण्यावरून ही रक्कम जियाच्या खात्यात वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधितांमध्ये आर्थिक व्यवहाराबाबत अनेक चॅट्सही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

या प्रकरणात आयुषकडून पोलादपूर परिसरात टाकण्यात आलेल्या ९३३ ड्रग्ज गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सुमारे १५.३९ लाख रुपयांच्या या गोळ्यांमध्ये विविध रंगांच्या टॅबलेट्सचा समावेश आहे. तपासादरम्यान आणखी काही लोकांनी या आरोपींच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचे समोर आले असून, त्यांचीही चौकशी लवकरच होणार आहे. ड्रग्ज पुरवठा करणारी ही एक संघटित टोळी असल्याचे संकेत मिळत असून पोलिसांनी उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT