Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

Mumbai Zombi Drug: मुंबई एका नव्या ड्रग्जच्या विळख्यात अडकली आहे. झोम्बीसदृश्य ड्रग्जमुळे तरुणाईचा जीव धोक्यात आला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ
Mumbai Zombi DrugSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईत ‘झोम्बी ड्रग्ज’ची भीती वाढली

  • मिरा-भाईंदरमधील व्हिडीओमुळे खळबळ

  • तरुणाईसाठी मोठा आरोग्य आणि सुरक्षा धोका

मुंबईला एका नव्या ड्रग्जच्या विळख्यानं घेरलयं. झोम्बीसदृश्य ड्रग्जमुळे तरुणाईचा जीव कसा धोक्यात आलाय. जीवंतपणी पुतळा बनवणारा झोम्बी ड्रग्ज नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

हॉलिवूड चित्रपटात आपण पाहिलेले 'झॉम्बी' आता प्रत्यक्षात मुंबईच्या रस्त्यांवर उतरले का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. बेंगळुरू, चंदीगड आणि बिहारनंतर आता मिरा-भाईंदरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. भररस्त्यात एक तरुण पुतळ्यासारखा एकाच जागी वाकून उभा आहे, हालचाल नाही की शुद्ध नाही.

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ
Bollywood Celebrity Drug Party : बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन! नोरा फतेही, श्रद्धा कपूर पार्टीत? धक्कादायक खुलासा कुणी केला?

दरम्यान अवघ्या 2 तासात स्वतःवरचा कंट्रोल घालवून मागे पुढे झिंगायला लावणारा आणि उभ्या उभ्याच बेशुद्ध करणारा झोम्बी ड्रग्ज देशात वेगानं पसरतं असल्याचं पाहयला मिळतयं. अमेरिकेनं गाई आणि घोड्यांना भूल देण्यासाठी तयार केलेल्या झायलझीननं लॅटिन अमेरिकेत हैदोस घातला होता. आता याच ड्रग्जचा भारतातही कसा शिरकाव झालाय ते पाहूयात...

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ
Pune drug racket: धक्कादायक! पुण्यात डिलिव्हरी ॲपचा वापर करून अमली पदार्थांची विक्री, पोलिसांनी केला भंडाफोड

जनावरांना भूल देण्यासाठी बनवलेलं झायलाझीन हे ड्रग्ज स्वस्त किंमतीत मिळतं. व्हेटर्नरी मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतं... हे ड्रग्ज फेन्टाईल या अतिशय घातक ड्रग्जसोबत घेतलं जातं. त्यामुळे त्याची नशा अनेक तास टिकते. आणि व्यक्ती कित्येक तास एकाच जागी स्थिर राहते. एवढंच नाही तर या ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यूही ओढवू शकतो.

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ
Mumbai drug case : मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; ५ जणांना अटक

नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणानं आधीच पोलीस प्रशासनाची झोप उडालीय. अशातच भविष्यात झोम्बी ड्रग्जनं तरुणाईला विळखा घातला तर परिस्थिती आणखी भयंकर होऊन जाईल. त्यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासनाला युद्धपातळीवर झोम्बी ड्रग्जमाफियांची पाळमुळं उखडून टाकणं गरजेचं आहे.

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ
Nesco Drug Party: पोरगा ड्रग्जमाफिया, बाप रेशन माफिया; नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या पटेलचा बाप निघाला अट्टल गुन्हेगार

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com