Dr. Ambedkar Mahaparinirvan Day Saam
मुंबई/पुणे

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत वाहतूकीत बदल; काही मुख्य रस्ते बंद, तर काही वन वेवर सुरू

Dr. Ambedkar Mahaparinirvan Day: महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात विशेष वाहतूक योजना लागू.

Bhagyashree Kamble

संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतिदिन देशभरात 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचं निधन झालं. दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येतात. चैत्यभूमीवर दरवर्षी जनसागर उसळतो. याच पार्श्वभूमीवर दादर परिसरात काटेकोर वाहतूक बंदोबस्त तैनात करण्यात येतो. दरम्यान, पोलिसांनी आतापासूनच बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे. तर, काही ठिकाणी वन वे वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरातून ४ किंवा ५ डिसेंबरलाच दादरला बुद्ध अनुयायी येतात. यामुळे दादरमध्ये २ दिवसांपूर्वीपासूनच कडेकोट बंदोबस्त केली जाते. मुंबई वाहतूक पोलिसांकडून दादर, शिवाजी पार्क तसेच चैत्यभूमी परिसरात ३ दिवसांसाठी वाहतूक व्यवस्था लागू केली जाते. ही विशेष वाहतूक व्यवस्था ५ डिसेंबर ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असते. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बुद्ध अनुयायी येत असल्यामुळे वाहतूकीकडे वाहतूक पोलिसांचे बारकाईने लक्ष असते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त तब्बल ४५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनाय मंदिर जंक्शन ते हिंदुजा रूग्णालय हा रस्ता पूर्णपणे वाहतूकीसाठी बंद राहणार. तर, वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून हिंदुजा रूग्णालय परिसरातील रहिवाशांना एस. बँक जंक्शनकडून डावीकडे वळून पांडूरंग नाईक रोड मार्गे राजा बडे चौकापर्यंत जाण्याची मुभा राहिल.

तसेच एस.के बोले रोडच्या उत्तरेकडील लेनवरून सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते पुर्तगाली चर्च जंक्शनदरम्यान एकमार्गी वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्थानिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpatipule : गणपतीपुळेमधील या हिडेन प्लेसेसवर तुम्ही गेले आहात का? मग या न्यू ईयरला नक्की करा फिरायला जायचा प्लॅन

Maharashtra Live News Update: तळोजा येथील अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग...

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Crime : मोठी बातमी! नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या कारमधून आले अन् वार केले

Taj Mahal: ताजमहाल इतका भक्कम कसा उभा आहे? खोल पाया आणि तळाशी असलेल्या विहिरींचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT