मृत्यूपूर्वी Whatsapp स्टेट्स ठेवलं, पोलीस हवालदाराचा मृत्यू; पोलीस दलात शोककळा

Shock in Satara as Police Officer Sachin Lavand Passes Away: पोलीस हवालदार सचिन लावंड यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ते सातारा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होते.
Shock in Satara as Police Officer Sachin Lavand Passes Away
Shock in Satara as Police Officer Sachin Lavand Passes AwaySaam
Published On

साताऱ्यात पोलीस हवालदाराच्या मृत्यूच्या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले सचिन लावंड यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कावीळ झाली होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांची अचानक प्रकृती गंभीर झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लावंड यांच्या निधनामुळे पोलीस दलातून शोक व्यक्त केला जात आहे.

सचिन लावंड असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते. सचिन लावंड मुळचे तालुका खटाव, दरूज गावातील रहिवासी होते. काही दिवसांपूर्वी त्यांची सातारा पोलीस मुख्यालयातून पुसेगाव पोलीस ठाण्यात बदली झाली होती. नवीन ठिकाणी ते रूजू झाले. मात्र, त्यांची प्रकृती खालवली.

Shock in Satara as Police Officer Sachin Lavand Passes Away
महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

आजारपणात त्यांनी काही दिवसांसाठी रजा घेतली होती. रजेवर असताना ते रूग्णालयात गेले. त्यांना काविळ झाल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांनंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. सचिन यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Shock in Satara as Police Officer Sachin Lavand Passes Away
'तुम्ही भाजपला विकल्या गेले..' अधिकाऱ्याचा मतदान केंद्रावर सावळा गोंधळ; काँग्रेस नेत्या संतापल्या, नेमकं घडलं काय?

मृत्यूपूर्वी सचिन लावंड यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवलं होतं. त्या स्टेट्समध्ये त्यांनी 'सकाळी ८ वाजता सावडण्याचा विधी आहे', असं स्टेट्स सचिन यांनी ठेवलं होतं. दरम्यान, सचिन यांच्या मृ्त्यूनंतर कुटुंब तसेच मित्र परिवराने शोक व्यक्त केला आहे. लावंड कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलाने, 'एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गमावला' अशी भावना व्यक्त केली.

Shock in Satara as Police Officer Sachin Lavand Passes Away
लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com