Mumbai Worli Wife Shoot Dead Saam Tv News
मुंबई/पुणे

Worli Crime : आधी पत्नीच्या डोक्यात धाडकन् गोळी झाडली, नंतर पतीनं आयुष्य संपवलं; मुंबई हादरली

Mumbai Worli Wife Shoot Dead : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. वरळीतील सिद्धार्थनगरमध्ये ही घटना घडलेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Prashant Patil

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. महाराष्ट्रातील पुणे, बीड, मुंबई, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तर पोलिसांचा धाकच उरलेला नाहीय. दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार अशा बऱ्याच प्रकारच्या घटना घडताना आपण पाहत असतो. याचदरम्यान, अतिशय धक्कादायक बातमी आता मुंबईतल्या वरळीमध्ये उघडकीस आली आहे. वरळीत पत्नीच्या डोक्यात गोळी झाडून पतीने स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. वरळीतील सिद्धार्थनगरमध्ये ही घटना घडलेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पुण्यातल्या बुधवार पेठेत महिलेची हत्या

उसने पैसे देण्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील सिंहरोड परिसरात घडली आहे. या प्रकरणाची माहिती त्याने आपल्या भावाला दिली. त्यानंतर तो गुरुवारी रात्री नांदेडसिटी पोलीस ठाण्यात हजर झाला. तसेच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी नितीन चंद्रकात पाटील हा रिक्षा चालक असून, श्यामली कमलेश सरकार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. श्यामली सरकार आणि नितीन पंडित यांची ओळख रिक्षातून प्रवासाच्या दरम्यान झाली होती. नितीन दररोज तिला सायंकाळी बुधवार पेठेत सोडत असे. याच ओळखीच्या आधारे श्यामलीने नितीनकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते.

पंडितने पैसे परत मागितले असता तिने पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली आणि यातून त्यांच्यात वाद झाला. बुधवारी (४ जून) दुपारी नितीन पंडित श्यामलीला घेण्यासाठी धायरी येथील तिच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा पैशांवरून वाद झाला. वाद विकोपाला गेला, आणि नितीनने श्यामलीची हत्या करण्याचं ठरवलं.

रागाच्या भरात नितीनने श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने घराबाहेरून कुलूप लावले आणि स्वतः घरातच लपून बसला. यामुळे कुणालाही या घटनेची माहिती समजली नाही. घटनेनंतर तो दिवसभर घरातच होता. अखेरीस त्याने ही संपूर्ण घटना आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर गुरुवारी रात्री तो नांदेड सिटी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT