Pune: उधार दिलेल्या पैशांवरून वाद; बुधवार पेठेत महिलेचा गळा आवळून संपवलं, पुण्यात खळबळ

Pune Shocking Crime: उसने दिलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

उसने पैसे देण्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील सिंहरोड परिसरात घडली आहे. या प्रकरणाची माहिती त्याने आपल्या भावाला दिली. त्यानंतर तो गुरुवारी रात्री नांदेडसिटी पोलीस ठाण्यात हजर झाला. तसेच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी नितीन चंद्रकात पाटील हा रिक्षा चालक असून, श्यामली कमलेश सरकार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. श्यामली सरकार आणि नितीन पंडित यांची ओळख रिक्षातून प्रवासाच्या दरम्यान झाली होती. नितीन दररोज तिला सायंकाळी बुधवार पेठेत सोडत असे. याच ओळखीच्या आधारे श्यामलीने नितीनकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते.

Crime News
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक, २० जण जखमी; गॅस गळतीमुळे वाहनं-घरांना आग | VIDEO

पंडितने पैसे परत मागितले असता तिने पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली आणि यातून त्यांच्यात वाद झाला. बुधवारी (४ जून) दुपारी नितीन पंडित श्यामलीला घेण्यासाठी धायरी येथील तिच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा पैशांवरून वाद झाला. वाद विकोपाला गेला, आणि नितीनने श्यामलीची हत्या करण्याचं ठरवलं.

Crime News
Amravati: “माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं” वडिलांची परिस्थिती बिकट अन्.. दहावीत ९६ टक्के मिळवणाऱ्या तरूणीची आत्महत्या

रागाच्या भरात नितीनने श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने घराबाहेरून कुलूप लावले आणि स्वतः घरातच लपून बसला. यामुळे कुणालाही या घटनेची माहिती समजली नाही. घटनेनंतर तो दिवसभर घरातच होता. अखेरीस त्याने ही संपूर्ण घटना आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर गुरुवारी रात्री तो नांदेड सिटी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com