Mumbai Marine Drive Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

समुद्रात तरूणीचा आढळला मृतदेह, चेहऱ्यावर जखमा, मृतदेह तरंगताना पाहून मरिन ड्राईव्हवर मुंबईकर भयभीत

Mumbai Marine Drive Crime: मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात समुद्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा असून, तिची ओळख मनिता गुप्ता अशी पटली आहे.

Bhagyashree Kamble

  • मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात समुद्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला.

  • तरुणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा असून, तिची ओळख मनिता गुप्ता अशी पटली आहे.

  • ती २ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

  • ही घटना हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरतून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरूणीचा मृतदेह सापडला. तरूणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. तरूणीचा मृतदेह समुद्रात सापडल्यानंतर कफ परेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसेच मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरूवात केली. तरूणीची हत्या झाली की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. मनिता गुप्ता (वय वर्ष २४) अशी तरूणीची ओळख पटली आहे. तरूणी २ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. तरूणी बेपत्ता झाल्यानंतर कफ परेड पोलिसांना कळवण्यात आले.

तरूणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या मिसिंगची केस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, तरूणीचा समुद्रात मृतदेह आढळल्यानंतर या घटनेमागील गुढ अधिक वाढले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तरूणीचा मृत्यू नेमका कसा झाला? तिचा मृतदेह नेमका कुणाला आणि कधी सापडला? तरूणीची हत्या करण्यामागे कारण काय? तरूणीच्या चेहऱ्यावर जखमा कसल्या होत्या? तरूणीची हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, तरूणीची ओळख पटली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Calling Update: तुमची पण कॉलिंग स्क्रीन बदलली आहे? जुनी स्क्रीन हवी आहे? मग आताच करा 'ही' सेटिंग

Ukdiche Modak: घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीमध्ये कार खड्ड्यात गेली, चालक गंभीर जखमी

Ganeshotsav : गणेशभक्तांवर वेगळंच संकट! ऑर्डर पूर्ण करू शकला नाही, मूर्तिकार अचानक गायब, मूर्तीसाठी धावाधाव

Maharashtra Government: घरबसल्या पूर्ण होतील शासकीय कामे, व्हाट्सअ‍ॅपवर मिळतील कागदपत्रे

SCROLL FOR NEXT