Maratha Leader Manoj Jarange
Maratha Leader Manoj JarangeSaam Tv News

'मी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता'; जरांगे पाटील अन् फडणवीसांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

Maratha Leader Manoj Jarange: २७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईकडे मोर्चा काढणार. २९ ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषण सुरू होणार. फडणवीसांना दोन दिवसांत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम.
Published on
Summary
  • २७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईकडे मोर्चा काढणार.

  • २९ ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषण सुरू होणार.

  • फडणवीसांना दोन दिवसांत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम.

  • मराठा समाजाला संविधानात बसणारं आरक्षण हवं असल्याचा पुनरुच्चार.

संपूर्ण राज्य गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेली असताना, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथून ते २७ ऑगस्टला मुंबईकडे प्रस्थान करणार असून, २९ ऑगस्टला आझाद मैदान गाठून उपोषणास बसणार आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोर्चाच्या मार्गाबद्दल माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईत जाणार आणि आरक्षण घेणार, असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. 'सरसकट गुन्हे मागे घेणार होते. पण मार खाऊन आमच्यावरच केसेस झाल्या. अजून आमच्यावरील केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठी बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिलंय. त्यांचं कुटुंब उघड्यावर आहे', असं जरांगे म्हणालेत.

'फडणवीस साहेबांनी न बसणाऱ्या २९ जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. ते खुन्नस दाखवत आहेत. आज मी प्रेमानं सांगतोय. आम्हाला आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईला जाणार नाही. दोन दिवसांचा वेळ, आजपासून मी बोलणार नाही. फडणवीस यांना ही प्रेमाची विनंती आहे', असं पाटील म्हणाले.

Maratha Leader Manoj Jarange
शत्रूला भरणार धडकी! ऑपरेशन सिंदूरनंतर अवघ्या ३ महिन्यांत नवी एअर डिफेन्स सिस्टम; एकाचवेळी ३ टार्गेट्सवर साधणार निशाणा | VIDEO

'आम्हाला संविधानात बसणारे आरक्षण हवे आहे. फडणवीस साहेबांना ही संधी आहे. ओबीसी तुमचे आहेत, आरक्षण दिल्यास मराठेही तुमचे होतील. मी एकदा अंतरवाली सराटे सोडले की कुणाचेही ऐकणार नाही. मंत्री येऊ द्या नाहीतर कुणीही मी कुणाचेही ऐकणार नाही. मी सरकारही पाडू शकतो', असंही जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Leader Manoj Jarange
धक्कादायक! मजूर बापाकडे I-Phoneचा हट्ट, १६ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं

'अंतरवाली सोडल्यानंतर मी कोणत्याच मंत्र्याचं ऐकणार नाही. २ महिन्यांपूर्वी मी फडणवीसांना फोन केला होता. मला गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्यासमोर मांडायच्या आहेत. तुम्ही अंतरवालीत या, असं मी फडणवीसांना म्हणालो होतो. देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील तर, आडमुठेपणा कुणी केला? हे मुंबईकरांनी सांगावे', असं पाटील म्हणाले.

Maratha Leader Manoj Jarange
ठाकरेंचा भाजपाला धक्का; रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला नेत्यानं हाती घेतली मशाल

'ही मागणी आजची नाही. पत्रकारांसमोर चार महिन्यापूर्वी तारीख जाहीर केली. मग आडमुठेपणा कुणी केला. चार महिन्यात सरकारने काहीही केले नाही. मराठ्यांना आऱक्षण मिळत नाही, त्यामुळे मी आता शांत बसणार नाही', असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com