धक्कादायक! मजूर बापाकडे I-Phoneचा हट्ट, १६ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं

Shocking Incident: बिहारच्या खगरिया जिल्ह्यात १६ वर्षीय मुलाची आत्महत्या. आयफोन न मिळाल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेतला. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने वडिलांनी नकार दिला.
Shocking Incident
Shocking IncidentSaam TvNews
Published On
Summary
  • बिहारच्या खगरिया जिल्ह्यात १६ वर्षीय मुलाची आत्महत्या

  • आयफोन न मिळाल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेतला

  • आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिलांनी नकार दिला

  • पोलिसांनी यूडी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयफोन न मिळाल्यानं एका अल्पवयीन मुलानं आत्महत्या केली आहे. १६ वर्षीय मुलाचे वडील मजूर आहेत. घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तरीही त्यानं आयफोनची मागणी केली. वडिलांनी आयफोन दिला नाही म्हणून मुलानं आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल कुमार (वय वर्ष १६) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तो सैदपूर गावात आपल्या परिवारासह राहत होता. त्याचे वडील मजूर आहेत. त्यानं वडिलांनी आयफोनची मागणी केली. घराची आर्थिक परिस्थिती पाहता कुटुंबीयांनी मुलाच्या आयफोनच्या मागणीला नकार दिला.

Shocking Incident
तारीख पे तारीख ! Mumbai-Goa highway बनणार कधी? राज्य सरकारकडून नवी डेडलाईन

त्यामुळे संतापलेल्या निखिलने शनिवारी रात्री घराजवळ टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलं. निखिल इंटरमिजिएटमध्ये शिक्षण घेत होता आणि दोन भावांमध्ये तो मोठा होता.

या घटनेनंतर कुटुंबात हळहळ आणि शोककळा पसरली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र कुटुंबीयांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Shocking Incident
काही वर्षांत व्हाल मालामाल! पोस्टाची भन्नाट स्कीम, दिवसाला २२२ रूपये गुंतवून मिळवा ११ लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com