काही वर्षांत व्हाल मालामाल! पोस्टाची भन्नाट स्कीम, दिवसाला २२२ रूपये गुंतवून मिळवा ११ लाख

Post Office Recurring Deposit: पोस्ट ऑफिस आरडी योजनेत दररोज २२२ रुपये जमा करून १० वर्षांत ११ लाखांचा निधी तयार होतो. या योजनेत वार्षिक ६.७% चक्रवाढ व्याज मिळते.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On
Summary
  • पोस्ट ऑफिस आरडी योजनेत दररोज २२२ रुपये जमा करून १० वर्षांत ११ लाखांचा निधी तयार होतो.

  • या योजनेत वार्षिक ६.७% चक्रवाढ व्याज मिळते.

  • गुंतवणूकदाराला एकटे किंवा संयुक्त खाते उघडण्याची सुविधा आहे.

  • ६ वर्षांनी खाते बंद करण्याचा आणि १ वर्षानंतर ठेवीवर कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

पगारातून आपण नेहमीच थोडी रक्कम बाजूला काढून सेविंग्स करतो. भविष्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने ही रक्कम जपून ठेवली जाते. उत्तम व्याजदर मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याची आपली इच्छा असते. अशावेळी पोस्ट ऑफिसची आरडी (Recurring Deposit) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम तयार करू शकता. दररोज फक्त 222 रुपये बाजूला ठेवून तुम्ही तब्बल 11 लाखांचा निधी उभारू शकता.

पोस्ट ऑफिसची आरडी योजना भन्नाट आहे. या योजनेत आपण दरम्हा काही रक्कम गुंतवून उत्तम निधी उभारू शकता. नियमिय जर आपण 222 रुपयांची गुंतवणूक केली तर, महिन्याला 6,660 रुपये जमा होतात. 5 वर्षात एकूण 3,11,600 रुपये जमा होतात. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेअंतर्गत आपल्याला वार्षिक 6.7 टक्के चक्रवाढ व्याज मिळते.

Post Office Scheme
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बसने अचानक पेट घेतला; ड्रायव्हरच्या... अनर्थ टळला पहा व्हिडिओ

म्हणजे आपल्याला व्याजावर व्याज मिळते. म्हणजेच 5 वर्षानंतर आपल्या खात्यात 4,75,297 जमा होतील. आणखी 10 वर्षासाठी ही गुंतवणूक वाढवली तर, तुमच्या खात्यात ७,९९,२०० रूपये जमा होतील. एकूण व्याजासकट ११,३७,८९१ रूपये जमा होतील. अशा प्रकारे आपण १० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर, ११ लाख रूपये जमा होतील. दररोज २२२ रूपये जमा करून आपण एवढी मोठी रक्कम तयार करू शकता.

Post Office Scheme
मराठी अभिनेत्रीमुळे गोविंदाचा संसार मोडणार? घटस्फोट घेण्यामागचं कारण काय? सुनीता म्हणाली..

आपण हे खातं एकटे किंवा संयुक्त नावाने उघडू शकता आणि त्यात गुंतवणूक करू शकता. जर आपल्याला पैशांची आवश्यकता असेल किंवा, पुढे पैसे भरू शकत नाही तर, आपण ६ वर्षांनी खातं बंद करू शकता. खातं बंद करण्यासाठी आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे. तसेच, १ वर्ष गुंतवणूक केली तर, तुमच्या ठेवीवर आपल्याला ५० टक्केपर्यंत कर्जही मिळू शकते. या कर्जावर आपल्याला २ टक्के अतिरिक्त व्याज आपल्याला द्यावं लागेल.

Post Office Scheme
२० हजार नोकऱ्या, ४० हजार कंपन्या अन् ३,२२,२४,००,३०,००० रूपयांची उलाढाल; भारतीय ऑनलाइन गेम्सचं साम्राज्य किती मोठं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com