प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बसने अचानक पेट घेतला; ड्रायव्हरच्या... अनर्थ टळला पहा व्हिडिओ

Tuljapur-Naldurg Road: तुळजापूर-नळदुर्ग रोडवर धावणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. प्रवासी भयभीत झाले पण चालकाच्या सतर्कतेमुळे सर्वजण सुखरूप बाहेर पडले.
Summary
  • तुळजापूर-नळदुर्ग रोडवर धावणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली.

  • प्रवासी भयभीत झाले पण चालकाच्या सतर्कतेमुळे सर्वजण सुखरूप बाहेर पडले.

  • स्थानिक ग्रामस्थ, महामंडळ अधिकारी आणि पोलिसांनी मदतकार्य केले.

  • आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी स्पार्किंगमुळे आग लागल्याची शक्यता.

तुळजापूर - नळदुर्ग रोडवर धावणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. तुळजापूरहून निलेगावकडे निघालेली एसटी बस तीर्थ बुद्रुकजवळ आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

एसटीला आग लागली असल्याचं समजातच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एसटीतील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच महामंडाळाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एसटीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रवाशांना एसटीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आगीचे कारण अस्पष्ट असून, बसच्या केबिनमध्ये स्पार्किंग झाल्याने बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com