मराठी अभिनेत्रीमुळे गोविंदाचा संसार मोडणार? घटस्फोट घेण्यामागचं कारण काय? सुनीता म्हणाली..

Govinda Extra Marital Affair: गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधाच्या चर्चेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ. ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी गोविंदाचं नाव जोडले जात असल्याची चर्चा.
Govinda Sunita
Govinda SunitaSaam TV News
Published On
Summary
  • गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधाच्या चर्चेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ

  • ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी गोविंदाचं नाव जोडले जात असल्याची चर्चा

  • सुनितानं महिलांना दिला जोडीदारावर आंधळा विश्वास न ठेवण्याचा सल्ला

  • गोविंदा-सुनिताच्या वैवाहिक आयुष्यावर संकटाची छाया

सध्या बॉलिवूडचा हिरो नंबर १ गोविंदा आपल्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता आहूजाच्या नात्याची चर्चा होत आहे. दोघांच्या नात्यात लवकरच दुरावा येईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान, गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधाची जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाचं ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत एक्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू असल्याची माहिती आहे. या चर्चेमुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सुनीतानं गोविदांचं अफेअर सुरू असल्याचं म्हटलंय. यामुळे सिनेइंडस्ट्रीत अनेकांत्या भुवया उंचावल्या. ती मराठी अभिनेत्री नेमकी कोण? अशी चर्चा रंगली. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Govinda Sunita
अमित ठाकरेंची आशिष शेलारांसोबत बैठक; नेमकी काय चर्चा झाली? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

गोविंदा अन् सुनीताचं लग्न ११ मार्च १९८७साली झालं. गोविंदाच्या नात्यातील सुनीता असल्याची माहिती आहे. गोविंदाचे मामा आनंद सिंग यांच्याच नात्यातील सुनीता आहे. आनंद सिंग हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते ह्रषिकेश मुखर्जी यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांची ओळख झाली. ते प्रेमात पडले. कमी वयातच लग्नबंधनात अडकले.

Govinda Sunita
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बसने अचानक पेट घेतला; ड्रायव्हरच्या... अनर्थ टळला पहा व्हिडिओ

गोविंदा आणि सुनीताला २ मुले आहेत. एका मुलाखतीत विवाहबाह्य संबंधाबाबत भाष्य करताना सुनीता म्हणाली, 'महिलांनी त्यांच्या जोडीदारावर आंधळा विश्वास ठेवू नये', असा सल्ला दिला होता. जर तुमचा पार्टनर भरकटला तर, न सुटणारे परिणाम भोगावे लागू शकतात', असं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com