ठाकरेंचा भाजपाला धक्का; रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला नेत्यानं हाती घेतली मशाल

Rashmi Thackeray Welcomes BJP Leader: नवी मुंबई भाजप पदाधिकारी सुश्मिता भोसले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.
Rashmi Thackeray Welcomes BJP Leader
Rashmi Thackeray Welcomes BJP LeaderSaam Tv News
Published On
Summary
  • नवी मुंबई भाजप पदाधिकारी सुश्मिता भोसले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

  • ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.

  • भाजपाला मोठा धक्का, ठाकरे गट अधिक बळकट झाला.

  • आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय घडामोड मानली जाते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी पक्षफोडीचं राजकारण सुरू असून, काहीजण स्वखूशीने पक्ष बदलत आहेत. अशातच नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या पदाधिकारी सुश्मिता भोसले यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ दिली आहे. यामुळे ठाकरे गट अधिक बळकट झालं आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत गडकरी रंगायतनमध्ये पक्षप्रवेश झाला.

Rashmi Thackeray Welcomes BJP Leader
शत्रूला भरणार धडकी! ऑपरेशन सिंदूरनंतर अवघ्या ३ महिन्यांत नवी एअर डिफेन्स सिस्टम; एकाचवेळी ३ टार्गेट्सवर साधणार निशाणा | VIDEO

नवी मुंबईमधील भाजपच्या पदाधिकारी सुश्मिता भोसले यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला आहे. रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपाला धक्का बसला असून, नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट फोडण्यासाठी इतर पक्षांचे प्रयत्न सुरू असताना, नवी मुंबईत ठाकरे गट अधिक बळकट झालं आहे.

Rashmi Thackeray Welcomes BJP Leader
..तर PM-CMची खूर्ची जाणार; १३० व्या घटनादुरूस्ती विधेयकेवर अमित शहा काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com