Mulund Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Mulund Police Station: मुलुंडच्या किसननगरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी (Mulund Police) ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुलुंड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

चिकन तंदुरीच्या (Chicken Tandoori) वादातून मुंबईमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलुंडच्या किसननगरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी (Mulund Police) ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुलुंड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात रविवारी रात्री चिकन तंदुरी देण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची रस्त्याच्या मधोमध निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पाच आरोपींना अटक केली. मुलुंड पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी किसननगर येथे ही घटना घडली. चिकन तंदुरीसाठी पैसे देण्यावरून झालेल्या वादानंतर अक्षय नार्वेकर नावाच्या तरुणाने रोख पैसे नसल्याने गुगल पेद्वारे इम्रानला पैसे दिले. हा वाद तिथे संपल्यानंतर अक्षय आणि आकाश हे दोघे सायंकाळी ७ वाजता मुलुंड पश्चिम येथील सलीमच्या चिकन सेंटरवर आले होते. त्याठिकाणी इम्रान आणि सलीम एकत्र उभे होते. दुपारी झालेल्या चिकन तंदुरीच्या पैशावरून झालेला इम्रान आणि अक्षय यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला.

इम्रान आणि सलीमने अक्षय आणि आकाशवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अक्षय आणि आकाश दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. पण अक्षय नार्वेकरचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर गंभीर जखमी आकाशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम ३०२, ३०७, १२० ब अन्वये ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT