मयुर राणे, मुंबई
देशात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मुलुंड पूर्वेकडील रहिवाशांना रात्री मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत घराबाहेर पडण्याची वेळ ओढवली आहे. मुंलुडमधील तब्बल पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मुलुंड पूर्वेमधील ४० हून अधिक पथदिव्यांचे जवळपास १५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महावितरण विभागाने थेट विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. तर कामावरुन घरी परतणाऱ्या मुलुंडकरांना अंधारात मार्ग काढत घर गाठावं लागत आहे. (Latest Marathi News)
मुलुंड पूर्व परिसरात अंदाजे दहा हजारांची लोकवस्ती आहे. मुलुंडमधील पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. म्हाडा कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष रवी नाईक यांनी याबाबत सांगितले की, '४७ पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय. तर खाडीलगत कॉलनी असल्याने याठिकाणी साप येण्याच्या घटना घडतात'.
म्हाडा कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष रवी नाईक पुढे म्हणाले,'रात्रीच्या अंधारात सापांच्या भीतीमुळे लहांना मुलांना घराबाहेर पाठण्याची वेळ आली आहे. तर या अंधाराचा चोरट्यांकडून गैरफायदा उचलण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या वादात सामन्यांची फरफट होत आहे. यावर लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे'.
याबाबत पालिकेच्या विद्युत विभागाशी संपर्क साधला, त्यांनी कुठलही थकबाकी नसल्याचे सांगितले. तर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून चुकीमुळे बिल लादण्यात येतेय. या पद्धतीत विद्युत पुरवठा खंडित करणे चुकीचे आहे. या प्रश्नाबाबत योग्य पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष करत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.