Nitin Gadkari : राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही माझं कौतुक केलं; नागपूरमधून नितीन गडकरी काय म्हणाले? जाणून घ्या

Nitin Gadkari News : नागपुरातील गणेशपेठ परिसरात लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Digital

Nitin Gadkari

ऑरेंज सीटी अशी जगभरात ओळख असलेल्या नागपूर शहराने अने रकॉर्ड बनवले आहेत. दरम्यान नागपूरला 24 तास पाणी देण्याचं स्वप्न पाहिले होतं. 70 टक्के जनतेला 24 तास पाणी मिळत आहे. तर आज झोपडपट्टी भागात ड्रम ठेवण्याची गरज राहिली नाही. आजपासून 6 महिन्याने 24 यास सर्वाना पाणी मिळेल, पुढील 25 वर्षात पाण्याचा त्रास होणार नाही हा विश्वास आहे. 89 नवीन जलकुंभ तयार होत आहे. तसंच टॉयलेटचे पाणी विकून 350 करोड मिळवणारं शहर नागपूर असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपुरातील गणेशपेठ परिसरात लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

माझा मुलगा राजनकारणात नाही, माझ्या कामावर केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे, ते माझे वारसदार आहेत. कोव्हिडं काळात अनेक अडचणी आल्यात, त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरवर दिले, हे काम करतांना कोणताही भेदभाव केला नाही. जो मत देईल त्याचाही काम करेल जो नाही देईल त्याचंही काम करणार. मी नागपुरात निवडणूक जिंकलो नसतो, देशभरात काम करू शकलो नसतो. मी कुठेही गेलो तरि नागपूर कराना विसरू शकत नाही, अशा भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

10 वर्षात 1 लाख करोड रुपयांचं काम केलं, हे रिल्स आहे अजून खूप काम शिल्लक आहे. देशाचा पटलावर नाही जगाचा पटलावर नागपूर शहरला घेऊ जाऊ हा विश्वास देतोय. बाबासाहेब यांनी दिलेले संविधान आमचा आत्मा आहे, संविधान बदलण्याचा विषयच येत नाही. लोकांना भ्रमित केले जात आहे, संविधान तोडणारे हे अपप्रचार करत आहे. मी लाखो कोटीचे काम केले, भ्रष्टाचार करण्याचा विषय येत नाही, एकजण जरी समोर आला तर राजकारण सोडून देईल, असं खुलं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं.

Nitin Gadkari
Sangli Lok Sabha: सांगलीत ठाकरे गट-काँग्रेस आमनेसामने? सतेज पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं यांचं नाव घेत केलं मोठं वक्तव्य

लुनावर बसून फिरून काम केलं. खूप लोकांचं प्रेम मिळाल. काम करतानाही कधी भेदभाव केला नाही. त्यामुळेच सोनिया गांधी, राहुल गांधी, ओवेसी यांच्यासह विरोधकांनीही माझ्या कामाचं कौतुक केलं. स्वतःच गाडीने या, कोणाला वाहन गाडी मिळणार नाही, मी आज पर्यंत इमानदारीने काम केले. लोकांचं प्रेम हीच माझी ताकद आहे. नागपूरकर हे माझं कुटुंब आहे, सर्वांसाठी माझे दरवाजे खुले आहेत. मत देणारा असो की न देणारा सर्वांचं काम करणार, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

Nitin Gadkari
Mahadev Jankar : देवेंद्र फडणवीस माझ्यावर प्रेम करतात, माझं कुठंतरी चुकलं असेल; महादेव जानकरांनी दिली कबुली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com