Mahadev Jankar : देवेंद्र फडणवीस माझ्यावर प्रेम करतात, माझं कुठंतरी चुकलं असेल; महादेव जानकरांनी दिली कबुली

Mahadev Jankar on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीसाठी महादेव जानकर यांना महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून साथ मिळते का, हे अद्याप अस्पष्ट आहे. याचदरम्यान, महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस माझ्यावर प्रेम करतात, माझं कुठंतरी चुकलं असेल,अशी कबुली दिली आहे.
mahadev jankar
mahadev jankarSaam tv

Mahadev Jankar News :

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महादेव जानकर यांना महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून साथ मिळते का, हे अद्याप अस्पष्ट आहे. याचदरम्यान, महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस माझ्यावर प्रेम करतात, माझं कुठंतरी चुकलं असेल,अशी कबुली दिली आहे. (Latest Marathi News)

रासप नेते महादेव जानकर आज पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, महादेव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. महादेव जानकर म्हणाले, 'गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानलं. त्यामुळे पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्याशी मला बहिणीचं नातं आहे. पंकजा मुंडे या एका पक्षाच्या सचिव आहेत. तो पक्ष देशातील मोठा आणि राज्यकर्ता पक्ष आहे. त्या पक्षाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात'.

mahadev jankar
Maharashtra Election : महाराष्ट्रात पुढील २-३ दिवसांत 'राजकीय धुळवड'; मोठ्या घडामोडींची शक्यता

'पंकजा मुंडे यांचं कुरुक्षेत्र हे बीड आहे. तर माझं कुरुक्षेत्र हे माढा आहे. आमचं नातं तुटणार नाही. त्यांचा राजकीय मार्ग वेगळा आहे. त्या बीडमधून खासदार व्हाव्यात. तसेच मी देखील माढामधून खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे. आमच्या दोघांचा संगम दिल्लीत व्हायला पाहिजे. एवढी अपेक्षा आहे. मी महायुतीबद्दल आताच बोलणे अपेक्षित नाही. रणजीत निबांळकर निवडून आले, तेव्हा आम्हीच सोबत होतो, असेही जानकर म्हणाले.

'आता मी स्वत: एका पक्षाचा अध्यक्ष आहे. मी खासदार झाल्यावर माढा बांधण्याचा प्रयत्न करेल. शरद पवारांनी जसं बारामती बांधली, त्याचप्रमाणे माढा माझं घर आहे. त्यामुळे माढा बांधण्याचा प्रयत्न करेल. नितीन गडकरी विकासपुरुष. गडकरींनी नागपूरचा विकास केला. त्याप्रमाणे माढाची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

mahadev jankar
Maharashtra Election : एक तरी वाक्य सांगा...; देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

'देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली मी काम केलं आहे. त्यांचं कधी चुकलं असं म्हणता येणार नाही. पण माझं कुठतरी चुकलं असेल. त्यांना चुकीचं म्हणणार नाही. मला माझा पक्ष वाढवायचा, त्याप्रणाणे त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. माझं आणि त्यांचं आजही काही भांडण वगैरे नाही. आजही माझ्यावर प्रेम करतात. ते भाजपचे नेते आहेत. त्यांना पक्षाच्या दृष्टीने अडचणी असतील. ते आज आणि उद्याही माझे मित्र राहतील, असे जानकर पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com