Maharashtra Election : एक तरी वाक्य सांगा...; देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत आहेत. त्यांच्या टीकेला फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024SAAM TV

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis :

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात ताकदीनं उतरलेल्या नेत्यांकडून परस्परांवर डागण्यात येणारे टीकास्त्र आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी महाराष्ट्राचं रण प्रचंड तापलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या विस्तवही जात नाही. उद्धव ठाकरेंकडून सातत्यानं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला जात आहे. हाच हल्ला फडणवीस यांनी परतवून लावताना ठाकरे यांना खुलं आव्हानही दिलं आहे.

लोकसभेची रणधुमाळी (Loksabha Election 2024) सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रातील २० उमेदवार घोषित केले आहेत. काही जागांवरचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळं महायुतीचं जागावाटप (Mahayuti seat sharing) रखडलं आहे.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीत पोहोचले आहेत. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जागावाटपावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. आमचं ८० टक्के काम पूर्ण झालं आहे. २० टक्के काम लवकरच पूर्ण करू. याबाबत सीईसीच्या बैठकीत निर्णय होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

उपमा सार्थ ठरवण्याचा ठाकरेंचा आटोकाट प्रयत्न

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे काढत आहेत. या दौऱ्यावर ते भाजप आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यावर माध्यमांनी विचारलं असता, फडणवीसांनी रोखठोक उत्तर दिलं. मी उद्धव ठाकरे यांना टोमणे बहाद्दर ही उपमा दिली आहे. मी दिलेली उपमा सार्थ ठरवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे. ते टोमणे मारतच असतात. काहीतरी बोलतच असतात, असं फडणवीस म्हणाले.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024
Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीसोबत जमलं तरचं उद्धव ठाकरेंशी युती.. प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य

मनोरंजन आणि हेडलाइन मिळवण्यापलीकडे त्यांच्याकडे काही नाही!

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं. एक वाक्य तरी विकासावर बोला. सामान्य माणसाला त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारं सरकार निवडून द्यायचं आहे. आम्ही हे करू, ते करू असं किमान एक तरी वाक्य सांगा, असा टोला फडणवीसांनी लगावला.

मागील २५ वर्षांत मुंबईत सांगता येईल असा एकही प्रकल्प त्यांनी आणला नाही. मी असे १० प्रकल्प सांगेल. जेवढे 'आयकॉनिक' प्रकल्प आहेत, ते माझ्या काळात सुरू झाले आहेत ते माझ्या काळात सुरू झाले आहेत. हे काही करू शकले नाहीत. ते विकासावर बोलू शकत नाहीत. केवळ मनोरंजन करणे आणि हेडलाइन मिळवण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही, असंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024
Maharashtra Election : महाराष्ट्रात पुढील २-३ दिवसांत 'राजकीय धुळवड'; मोठ्या घडामोडींची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com