Nashik Bus Fire
Nashik Bus FireSaam tv

Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट; प्रवासी सुखरुप

Nashik Bus Fire Latest news : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील मोहदरी घाटात एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. शनिवारी रात्री ८ वाजता मोहदरी घाटात नाशिक-सिन्नर बसला आग लागल्याची घटना घडली.

अजय सोनवणे, नाशिक

Nashik Bus Fire News :

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील मोहदरी घाटात एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. शनिवारी रात्री ८ वाजता मोहदरी घाटात नाशिक-सिन्नर बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये १० प्रवासी होते. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर डेपोच्या एसटी बसने अचानक पेट घेतला. या लागलेल्या आगीत बसमधील केबीन जळून खाक झाली. तर चालकाने प्रसंगावधन राखल्याने प्रवासी आगीतून बचावले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. सिन्रर डेपोची नाशिक ते सिन्नर बस ही प्रवाशांना घेऊन नाशिक-पुणे महामार्गावरून प्रवास करत होती. या बसमध्ये चालक , वाहक यांच्यासहित १० प्रवासी बसमध्ये होते.

Nashik Bus Fire
Nandurbar Bus Fire : नंदुरबारमध्ये ST बसला लागली अचानक आग; प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

नेमकं काय घडलं?

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहदरी घाटाच्या अलीकडे बस आल्यावर चालकाला अचानक बसच्या केबिनमध्ये धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यानी बस रस्त्यावर उभी केली. त्यांनी तातडीने बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर बसमधील केबिनने पेट घेतला. अवघ्या १५ ते २० मिनिटांत संपूर्ण केबिनला आग लागली. काही वेळानंतर पोहोचलेल्या सिन्नर एमआयडीसी येथील फायर ब्रिगेडचे जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

Nashik Bus Fire
Arvind Kejriwal: 'अटक आणि रिमांड दोन्ही बेकायदेशीर, तात्काळ सुटका करा', केजरीवाल यांची हायकोर्टात धाव

दरम्यान, एमआयडीसी येथील अग्निशमन दलाचे जवान आणि सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवानांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्याचा शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत संपूर्ण कॅबिनचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचत मुसळगाव, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस तसेच सिन्नर बस स्थानकाचे प्रमुख हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com