संजय गडदे, साम टीव्ही
Mumbai Crime News : मुंबईच्या जुहू परिसरात एका ७४ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून यामध्ये मृत महिलेचा मुलगा आणि त्यांच्या नोकऱ्याचा समावेश आहे. काही दिवसापूर्वी वीना कपूर (७४वर्षे) नावाच्या महिलेची आपल्या मुलाकडून बेसबॉलच्या स्टिकने मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या हप्तेमागील खरं कारण म्हणजे संपत्ती असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
सचिन गोवर्धनदास कपूर (वय ४३ वर्ष) छोटु उर्फ लालुकुमार मंडल (वय २५ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची (Crime News) नावे आहेत.आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या अमेरिकेतील मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वीना जुहू येथे आपल्या मुलासोबत राहत होत्या. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता.
मृत वीणा आणि आरोपी सचिन यांच्यात संपत्तीच्या वादातून नेहमी खटके उडायचे. दरम्यान, संपत्ती हडप करण्यासाठी आरोपी सचिन याने आपल्या वृद्ध आईचा गळा कापडाने आवळून व बेसबॉल स्टिकने मारून हत्या केली. त्यानंतर मृतदेह प्लास्टिक आणि पुठ्ठ्यांमध्ये गुंडाळून त्या इमारतीत नोकरी करणाऱ्या नोकराच्या मदतीने ते मृतदेह माथेरान येथील खोलदरीत फेकला.
दरम्यान, वीणा यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या दुसऱ्या मुलाने त्यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी अनेक फोन केले. मात्र, वीणा काही फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे त्याने सोसायटीतील सुरक्षारक्षक आणि सुपरवायझर यांना फोन करून घराकडे जाऊन चौकशी करण्यास सांगितले. दोघांकडूनही काही उत्तर मिळाले नसल्याने वीणा यांच्या मुलाचा संशय बळावला. त्याने जुहू पोलिसांत आपली आई हरवली असल्याची तक्रार नोंदवली.
या तक्रारीची दखल घेऊन झोप पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मुलगा आणि त्याला मदत करणारा नोकर यांना ताब्यात घेत चौकशी करून गुन्ह्याची उकल केली. आरोपी मुलाने आपला गुन्हा कबूल केला असून त्याला न्यायालयामध्ये हजर केला असता दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.