Mumbai Crime : पतीने सर्च केलं मसाज सेवा; पहिलाच दिसला पत्नीचा फोटो, त्यानंतर जे घडलं ते कल्पनेच्या पलीकडे!

वेबसाईट अधिक तपासली असता फिर्यादीची पत्नी आणि बहीण यांचे देखील फोटो त्या ठिकाणी आढळून आल्याने फिर्यादीना धक्काच बसला.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

Mumbai Crime News : तुम्ही जर फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल माध्यमांचा वापर करत असाल आणि त्यावर कुटुंबातील प्रियजनांचे, फोटो अपलोड करत असाल तर तुम्ही वेळीच सावध झालंच पाहिजे. कारण मुंबईच्या (Mumbai) खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नात्याने ननंद भावजयी असलेल्या दोन महिलांचे फोटो फेसबुक वरून चोरून ऑनलाइन वेश्या व्यवसाय करणाऱ्या वेबसाईटवर अपलोड केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. महिलांच्या तक्रारीवरून महिला आणि तिच्या साथीदार व वेबसाईट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Nashik Bus Accident : नाशिकमध्ये ST बसला भीषण अपघात; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTO पाहा

याप्रकरणी खार पोलिसांनी एक महिलेला अटक केली आहे. रेश्मा रितेश यादव असं अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी यांनी Google वर मसाज सेवा मिळवण्यासाठी सर्च केले असता एक वेबसाईट समोर आली. ती वेबसाईट उघडल्यानंतर त्यावर अनेक मुली आणि महिलांचे वेगवेगळे फोटो आढळून आले. वेबसाईट अधिक तपासली असता फिर्यादीची पत्नी आणि बहीण यांचे देखील फोटो (Crime News) त्या ठिकाणी आढळून आल्याने फिर्यादींना धक्काच बसला. त्या फोटो खाली सेक्सचा दर व इतर अश्लील मजकूर टाईप करून लैंगिक भावना भडकवणारे साहित्य प्रसारित केल्याचे आढळून आले.

या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी यांनी आपली पत्नी आणि बहीण यांना विश्वासात घेऊन यासंबंधी विचारणा केली. आम्ही पूर्वी फेसबुक वर फोटो अपलोड केले होते. मात्र असा कुठल्याही गैरप्रकारात आमचा सहभाग नसल्याचे त्या दोघींनी फिर्यादी यांना सांगितले. मग तिघांनी विचार करून त्या वेबसाईट वरील नंबर वर संपर्क साधून खार पश्चिमेकडील भागात त्या महिलेला भेटण्यासाठी बोलावले. संबंधित आरोपी महिला त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे अगोदरच फिर्यादीची पत्नी आणि बहीण या उपस्थित होत्या.

Mumbai Crime News
संतापजनक! मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार, मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

त्यांनी तिला जाब विचारला असता तिने उडवा उडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली त्यांच्यात बाचाबाचे झाली व फिर्यादी आणि त्यांची पत्नी व बहीण या तिघांनी त्या आरोपी महिलेला खार पोलीस ठाण्यात आणून तिच्या विरोधात आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून फिर्यादीची पत्नी व बहीण यांची बदनामी केली म्हणून रेश्मा रितेश यादव (27 वर्ष ) तिचे साथीदार व वेबसाईट यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद करण्यात आली.

यानंतर पोलिसांनी रेश्मा यादव हिला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला या गुन्ह्याप्रकरणी जामीन देखील मंजूर केला आहे. मात्र पोलीस या मागचा खरा सूत्रधार कोण आणि या वेबसाईटवरील फोटो नेमके कोणाचे आहेत ते खरे आहेत की खोटे याबाबत देखील तपास करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com