पुण्यात खळबळ; तळजाई टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाची धारधार शस्त्राने हत्या

मैत्रिणी समवेत फिरत असलेल्या तरुणावर तरुणांसह त्याच्या समवेतच्यासा टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

Pune Crime News : मैत्रिणी समवेत फिरत असलेल्या तरुणावर तरुणांसह त्याच्या समवेतच्यासा टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी तळजाई टेकडीच्या परिसरात घडली. दरम्यान, याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आठ तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. (Latest Marathi News)

साहिल चांगदेव कसबे (वय १९) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी राज वाघमारे (रा. तळजाई वसाहत), डेब्या उर्फ तुषार आरणे (रा. तळजाई ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार करण उर्फ सोन्या वाघमारे फरार आहे.

Crime News
Nashik Accident: नाशिकमध्ये अपघाताचे सत्र सुरूच, भीषण अपघातात 4 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, साहिल एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या ओळखीतील एकाने तिघा आरोपींना 'साहिल माझ्या मैत्रिणीसोबत फिरतो, तुम्ही त्याला बोलावून घ्या आणि कानाखाली आवाज काढा' असे सांगितलं. त्यानुसार त्याने तिघांना साहिलचा फोटो पाठविला.

Crime News
VIDEO : लग्नासाठी जमलेले वऱ्हाडी एकमेकांशी भिडले; क्षुल्लक कारणावरुन जोरदार राडा

दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता साहिल हा तळजाई परिसरातील सदु शिंदे मैदानाजवळ आला. त्यावेळी तिघांनी साहिलला अडवून बेदम मारहाण केली. त्यानंतर तुषार आरणे व त्याच्या साथीदारांनी साहिलवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल झाले.

सहकानगर पोलिसांना या घटनेतील संशयित इंदापूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे, पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदे, महेश मंडलीक यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com