Mulund Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, भररस्त्यात चाकूने वार करत तरुणाला संपवलं; मुंबई हादरली

Mulund Crime: मुलुंडमध्ये एका फेरिवाल्याची हत्या करण्यात आली. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून या तरुणाला संपवण्यात आले. भररस्त्यात चाकूने वार करण्यात आले. या घटनेमुळे मुलुंड हादरले.

Priya More

Summary -

  • मुलुंडमध्ये भररस्त्यात हत्या

  • फेरिवल्याला चाकूने भोसकलं

  • पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हत्या

  • २४ वर्षीय फेरीवाल्याचा जागीच मृत्यू

मयूर राणे, मुंबई

मुंबईतल्या मुलुंडमध्ये हत्याकांडाची घटना घडली. भररस्त्यात चाकूने सपासप वार करत फेरिवाल्याची हत्या करण्यात आली. मुलुंड पश्चिमेला ही घटना घडली. घरच्यांची बदनामी करत असल्याच्या कारणामुळे राग मनात धरून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुलुंडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेला मार्केट परिसरात ही घटना घडली. फेरीवाल्याने फेरीवाल्याची निर्घण हत्या केली. भाजी कापायच्या चाकूने त्याने त्याच्यावर सपासप वार केले. भरचौकात ही घटना घडली. २४ वर्षीय संतोष बिंद याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फेरीवाल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी ४२ वर्षीय राकेश धिवारला मुलुंड पोलिसांनी अटक केली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीला संशय होता की मृत व्यक्तीचा त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध आहे. आजही संतोष बिंदने काही वक्तव्ये करून आरोपीला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. याच वादातून संतापाच्या भरात आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Fort : प्राचीन गुहा, कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् मजबूत भिंती, 'हा' किल्ला आहे कर्जतजवळील खास आकर्षण

Palak Idli Recipe : मुलांच्या डब्यासाठी बनवा अण्णा स्टाईल मऊ लुसलुशीत पालक इडली, जाणून घ्या स्टेप्स

खळबळजनक! अल्पवयीन मुलाचा शेजाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Maharashtra News Live Update : वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

चाळ माफियांचा हैदोस! १२ गुंड तोंडाला रुमाल बांधून आले, लाठ्याकाठ्यांनी महिलांना अमानुष मारहाण, अत्याचाराचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT