Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! किशोर पेडणेकरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या, घरात बायको मृतावस्थेत आढळली

Husband End His Life By Jumping From Building Wife Found Dead: मुंबईत एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचं समोर आलंय. तर त्याची बायको मृतव्यवस्थेत घरात आढळून आलीय.

Rohini Gudaghe

सचिन गाढ, साम टीव्ही मुंबई

मुंबईतील गोरेगावच्या जव्हार नगरमध्ये संशयास्पद अवस्थेत पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर, असं या मृत दांम्पत्याचं नाव आहे. किशोर पेडणेकर यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. तर पत्नी राजश्री पेडणेकर यांचा घरात मृतदेह सापडला होता.

धक्कादायक घटना

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून राजश्री यांची हत्या झाल्याचा संशय वर्तवला जात आहे. ही धक्कादायक घटना गोरेगावच्या जव्हार नगर येथे घडली आहे. गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केलाय. आज २ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना समोर (Mumbai Crime News)आलीय.

इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

गोरेगाव पोलिसांना आज सकाळी साडेपाचच्या सुमारास एक माहिती मिळाली. जवाहर नगर येथील टोपीवाला मॉलजवळ बीएमसी मार्केट परिसरात एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी या व्यक्तीला रुग्णालयात नेलं असता, त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. दरम्यान या व्यक्तीची ओळख किशोर पेडणेकर असल्याचं (Mumbai News) पटलं. किशोर पेडणेकर हे वसईमध्ये एका खाजगी कंपनीत काम करत होते, तर त्यांची पत्नी राजश्री पेडणेकर फिजिओथेरपिस्ट असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली आहे.

घरात पत्नी मृतावस्थेत आढळली

त्यावरून पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. तेव्हा घराला कुलूप असल्याचं समोर (Crime News) आलं, तर किशोर पेडणेकर यांच्या गळ्यात पोलिसांना एक चावी दिसली होती. या चावीच्या मदतीने पोलिसांनी घर उघडलं. तेव्हा घरात भयानक दृश्य दिसलं. पलंगावर राजश्री पेडणेकर यांचा मृतदेह पोलिसांना आढळला. मृतदेहाच्या शेजारी एक ओढणी देखील होती. याच ओढणीच्या मदतीने राजश्री यांचा गळा आवळून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलला पाठवले (Wife Found Dead) आहेत. गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा केलाय. या दांपत्याला एक मुलगा आहे, तो दिल्लीत राहत असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी त्याला या घटनेबद्दल कळवले असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT