Mumbai News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : अपहरणाचा बनाव रचला, पत्नीकडे ५ लाख मागितले; पतीचा डाव त्याच्यावरच उलटला

Mumbai News : जितेंद्र जोशी असं आरोपीचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या मालाड पश्चिम बांगुनगर पोलिसांनी एका विचित्र अपहरण प्रकरणाची उकल केली आहे. ज्यामध्ये आरोपीने स्वतःला अपहरणकर्ते सांगून त्याच्याच कुटुंबियांकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती.

जितेंद्र जोशी असं आरोपीचं नाव आहे. जितेंद्र हा डी मार्ट, मालाड पश्चिम लिंक रोड येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. ही घटना ३१ मे रोजी रात्री 11.30 वाजता घडली. डी मार्टमधून बाहेर पडल्यानंतर आरोपीने मोबाईल बंद केला.

जितेंद्र घरी न परतल्याने पत्नीने त्याच्या मोबाईलवर अनेकवेळा कॉल केला. मात्र त्याचा फोन बंद दाखवत होता. त्यानंतर जितेंद्रच्या पत्नीला व्हॉट्सअप कॉल करून 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. (Crime News)

जितेंद्रच्या पत्नीने पोलिसात धाव घेत, याबाबत तक्रार दिली. अपहरणाची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. तपासात आजूबाजूच्या परिसरात बसवण्यात आलेल्या 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. (Maharashtra News)

ज्यामध्ये आरोपी स्वत: बाईक चालवत एका व्यक्तीला सोबत घेऊन जात होता. त्यानंतर बांगुनगर पोलिसांनी आरोपीला मालाड येथून अटक करून या अपहरण प्रकरणाची उकल केली. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी जितेंद्र अटक केल्यानंतर त्याची कसून चौकसी केली. त्यावेळी जितेंद्रने सांगितलं की, त्याने भरमसाठ कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्याने हा अपहरणाचा कट रचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT