ॲग्रीस्टॅकमुळे राज्यातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांना डिजिटल ओळख; देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Digital Agriculture : राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकिय योजनांचा लाभ योग्य पद्धातीने मिळावा यासाठी महाराष्ट्रात ॲग्रीस्टॅक योजना रोबण्यात येत आहे.
Benefits of AgriStack digital Farmer ID in Maharashtra
Benefits of AgriStack digital Farmer ID in Maharashtrasaam tv
Published On: 

राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने मिळावा, तसेच कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा विस्तार व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात ॲग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असून, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रातील माहिती आणि डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी विकसित करण्यात आलेले डिजिटल व्यासपीठ आहे. या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डिजिटल ओळख अर्थात फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यात येत आहे. दि. १८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

Benefits of AgriStack digital Farmer ID in Maharashtra
Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना, १ लाख रिक्षा मिळणार, आरटीओ फी माफ; कसा घेणार लाभ?

सन २०२१ च्या कृषी गणनेनुसार राज्यात १.७१ कोटी खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेमुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार असून, कृषी पायाभूत सुविधा निधी तसेच शेतीच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्यासही मदत होणार आहे. याशिवाय पीक विमा, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नुकसानभरपाई, शेतकऱ्यांचे सर्वेक्षण आणि कृषी व संलग्न विभागांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरत आहे.

ॲग्रीस्टॅकमुळे योजनांचा लाभ वितरण अधिक सुलभ

ॲग्रीस्टॅकमुळे शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनींची आधारसंलग्न माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी करणे अधिक सोपे होऊन लाभ वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आलेली आहे. तसेच वारंवार कागदपत्रांची पडताळणी करण्याची आवश्यकता कमी झालेली आहे. शेतकऱ्यांना वारंवार शेतजमिनीची मालकी सिध्द करावी लागत नसून शेतीच्या योजना गतीमानतेने व प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ले, विविध संस्थांशी संपर्क आणि नाविन्यपूर्ण कृषी कार्यक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठीही या डिजिटल व्यासपीठाचा उपयोग होत आहे.

दि. २१ जानेवारी २०२५ पासून नागरी सुविधा केंद्रांमार्फत फार्मर रजिस्ट्रीची नोंदणी प्रक्रिया करण्यात येते. कृषिविषयक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. १५ एप्रिल २०२५ पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नुकत्याच वितरित झालेल्या २४ व्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ८५.५८ लाख लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ८४.६० लाख शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक आयडी उपलब्ध आहे. सामायिक सातबारा असलेल्या सर्व शेतकऱ्यांचीही ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करण्यात येत असून, अशा शेतकऱ्यांच्या ओनरशिप डिटेलमध्ये 'जॉईंट' असा शेरा नमूद करण्यात येतो.

Benefits of AgriStack digital Farmer ID in Maharashtra
Fact Check : राज्यातील जिल्हा परिषदेत शिपाई भरती, पगार २५ हजार; नेमकं सत्य काय? जाणून घ्या

शेती क्षेत्रातील माहिती संकलन अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्रात खरीप २०२३ पासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल क्रॉप सर्वेक्षण राबविण्यात आले. ई-पीक पाहणी केंद्रीय डीसीएस ॲपव्दारे ई-पीक पाहणी करण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२६ च्या ई-पीक पाहणीमध्ये ३.१० कोटी पेक्षा जास्त प्लॉटचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.

वनपट्टेधारक शेतकऱ्यांचाही ॲग्रीस्टॅकमध्ये समावेश

ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात येत आहे. राज्यात जवळपास दोन लाख वनपट्टाधारक शेतकरी असून, त्यापैकी १ लाख ५८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठीची माहिती आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त झाली आहे. यापैकी ७८ हजार वनपट्टाधारक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी पूर्ण झाली आहे.

अपवादात्मक प्रकरणातील शेतकऱ्यांनाही ॲग्रीस्टॅक उपलब्ध होणार

अपवादात्मक प्रकरणातील ॲग्रीस्टॅक उपलब्ध करून देण्याबाबत भूमि अभिलेख, पुणे जमाबंदीआयुक्त व संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.या समितीने शासनास अहवाल सादर केल्यानंतर काही अपवादात्मक प्रकरणात शेतकरी ओळख क्रमांक देण्यासाठी महसूल विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय काढला आहे.

त्यानुसार महसूल विभागाचा शासन निर्णय दि.१८ सप्टेंबर २०२६ मध्ये दिलेल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना कार्यपध्दतीनुसार ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून तपासणी,मंडळ अधिकारी यांच्याकडून पडताळणी तहसिलदार यांच्याकडून अंतिम मान्यता त्यानंतर केंद्रीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा यांना माहिती देण्यात येईल या माहितीच्या आधारे नागरी सुविधा केंद्रामार्फत इतर शेतकऱ्यांप्रमाणे विहित कार्यपध्दतीनुसार ॲग्रीस्टॅक उपलब्ध होतील. या निर्णयामुळे आतापर्यंत नियमित प्रक्रियेबाहेर राहिलेल्या पात्र शेतकरी व जमीनधारकांना शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना ॲग्रीस्टॅकच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

आपले सरकार सेवा केंद्रात फार्मर आयडी काढण्याचे आवाहन

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करून घ्यावी अथवा https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या पोर्टलवरती देखील आपण जावून ॲग्रीस्टॅक नोंदणी करू शकतो.या योजनेबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.