Avocado Benefits : रोज ॲव्होकाडो खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! १४ दिवसांत शरीरात दिसतील हे बदल?

Benefits of Eating Avocados Daily : आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाणारे ॲव्होकॅडो हे सुपरफूड केवळ चवीलाच नव्हे, तर शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्तम पर्याय आहे.
health benefits of eating avocado for 14 days continuously
health benefits of eating avocado for 14 days continuouslysaam tv
Published On: 

ॲव्होकाडो हे पौष्टिक फळ सध्या आरोग्याबाबत जागरूक असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. चवीला लोण्यासारखे मऊ असणाऱ्या या फळामध्ये आरोग्यदायी फॅट्स, फायबर, पोटॅशियम आणि विविध जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

दररोज १४ दिवस ॲव्होकाडो खाल्ल्यास शरीरात नेमके कोणते बदल होऊ शकतात? याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे फायदे सांगितले आहेत. विशेषतः हृदयाचे आरोग्य, पचनसंस्था, रक्तदाब आणि भूक नियंत्रणासाठी हे फळ उपयुक्त ठरू शकते.

health benefits of eating avocado for 14 days continuously
Baby Care : लहान बाळांच्या डोळ्यांना काजळ लावणे योग्य की अयोग्य? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

दररोज ॲव्होकाडो खाल्ल्याने होणारे ६ फायदे

पचनक्रिया सुधारण्यास मदत

ॲव्होकाडोमध्ये भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असते. हे फायबर आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. मलविसर्जन नियमित होण्यास मदत होते.

पोट जास्त वेळ भरलेले राहते

ॲव्होकाडोमध्ये फायबर आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. त्यामुळे अन्नाचे पचन धिम्या गतीने होते आणि पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे वारंवार भूक लागणे, मधल्या वेळेत काहीतरी खाण्याची इच्छा होणे आणि अतिरिक्त खाणे कमी होण्यास मदत होऊ शकते.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत

ॲव्होकाडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजेच आरोग्यदायी चरबी असते. यामुळे अ‍ॅव्होकॅडो आहारात घेतल्यास खराब कोलेस्टेरॉल (LDL) नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

त्वचेसाठी उपयुक्त

ॲव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.हे घटक त्वचेच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करतात. त्यातील आरोग्यदायी फॅट्स त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासही मदत होते. नियमित आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून अ‍ॅव्होकॅडो खाल्ल्याने त्वचेला फायदा होऊ शकतो.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत

ॲव्होकाडोमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण तुलनेने कमी असून फायबर आणि आरोग्यदायी चरबीचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांसोबत अ‍ॅव्होकॅडो खाल्ल्यास जेवणानंतर रक्तातील साखर वेगाने वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र मधुमेहावरील औषधांचा पर्याय म्हणून अ‍ॅव्होकॅडोकडे पाहू नये.

health benefits of eating avocado for 14 days continuously
Health Tips : रोज सकाळी भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' ७ बदल; हृदयापासून ते झोपेपर्यंत मिळतात अनेक फायदे

रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त

ॲव्होकाडोमध्ये पोटॅशियम हे महत्त्वाचे खनिज असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.

दिवसाला किती अ‍ॅव्होकॅडो खावे?

आहारात साधारण अर्धे ॲव्होकाडो समाविष्ट करून सुरुवात करता येते.एकूण कॅलरी आणि आहारानुसार ॲव्होकाडो खाण्याचे प्रमाण ठरवावे.

ॲव्होकाडोचा आपल्या आहारात कशा प्रकारे समावेश करु शकतो?

  • पोळी किंवा ब्रेडसोबत मॅश करून खाऊ शकता.

  • सॅलडमध्ये तुकडे करून घालू शकता.

  • सँडविचमध्ये वापरू शकता.

  • बटर किंवा मेयोनेझऐवजी काही पदार्थांमध्ये वापरू शकता.

ॲव्होकाडो खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • ॲव्होकाडोमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे प्रमाणात खावे.

  • जास्त फायबरमुळे काही लोकांना गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

  • किडनीचा आजार असल्यास ॲव्होकाडो खाण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • ॲव्होकाडोची अ‍ॅलर्जी असल्यास ते खाणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.