Namdeo Kumbhar
चाणक्य नीतीनुसार सकाळच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या कमाई आणि बचतीवर होतो.
अनेकदा चांगली कमाई असूनही चुकीच्या सवयी आणि उधळपट्टीमुळे महिन्याच्या अखेरीस पैशांची चणचण भासते.
उशिरा उठल्यामुळे होणारी घाई, राग आणि चिडचिड प्रगतीच्या आड येते. दिवसाची सुरुवात शांत मनाने करा.
सकाळी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. कुटुंबाशी प्रेमाने बोला आणि दिवसभराचे नियोजन करा.
ताटात लागेल तेवढेच अन्न घ्या. अन्न वाया घालवणे आणि कोणी बनवलेल्या जेवणाची नावे ठेवणे टाळा.
कमाईचा विनाकारण दिखावा करू नका किंवा इतरांच्या पैशांची चेष्टा करू नका. गरजेनुसारच खर्च करा.
नको त्या वस्तूंची खरेदी केल्याने खिशावर ताण येतो. कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी ती खरंच गरजेची आहे का, याचा विचार करा.
पगार किंवा कमाई कितीही असो, त्यातील काही रक्कम बाजूला काढून ठेवा. लहान बचतही पुढे मोठा आधार देते.
नियमित बचतीची सवय लावल्यास गरजेच्या किंवा कठीण वेळी कोणापुढेही हात पसरावे लागत नाहीत.
सकाळी शांत राहणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि नियमित बचत करणे या सवयी आर्थिक स्थैर्य देतात.