Kalyan News : कोयते हातात घेऊन काढला व्हिडिओ, सोशल मीडियावर झाला व्हायरल; पाेलिसांनी ठाेकल्या बेड्या

हा तरूण कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात राहत असल्याचे कळताच पोलिसांचे पथक रवाना झाले.
Kalyan Crime News
Kalyan Crime Newssaam tv
Published On

- अभिजित देशमुख

Kalyan News : दहशत निर्माण करण्यासाठी घातक शस्त्रासह फोटो, व्हिडीओ तयार करत हे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याचे फॅड वाढत चालले आहे. कल्याण मधील एका तरुणाने देखील अशाच प्रकारे चार कोयते हातात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला. (Maharashtra News)

Kalyan Crime News
Shivrajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळयात यंदा 'या' कार्यक्रमांचे आयाेजन; शिरकाई देवी परिसर हर हर महादेवने दुमदुमला

दरम्यान घातक शस्त्रे बाळगणे हा गुन्हा असल्याने हीच हौस तरुणाच्या चांगलीच अंगलट आली. हा व्हिडियो कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी तत्काळ या तरुणाचा शोध घेऊन त्याला पोलिसी हिसका दाखवत अटक केली. प्रदीप यादव असे या तरुणाचे नाव आहे.

Kalyan Crime News
Mumbai Goa Highway News : वाहतुकदारांनाे ! मुंबई गोवा महामार्गावर चार दिवस अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या कारण

पुण्यातील कोयता गंगच्या दहशतीनंतर कोयता हे घातक शस्त्रात गणले जाऊ लागले आहे. तर एकीकडे घातक शस्त्राचा वापर गुंडाकडून केला जात असतानाच कल्याण मध्ये देखील काही तरुनांकडून कोयता, तलवारीसारखी धारदार शस्त्रे बाळगून दहशत माजवण्याचे प्रकार करत आहेत. यामुळेच अशा घातक तरूणावर पोलीस सोशल मिडीयाच्या माध्यमातून करडी नजर ठेऊ लागले आहेत. एका तरुणाने चार कोयते हातात घेतलेला व्हिडियो स्टेटसला ठेवला.

Kalyan Crime News
Vasantrao Kale Sugar Factory Election : वसंतराव काळे साखर कारखाना निवडणूक: NCP त पडली माेठी फूट, शरद पवारांच्या बैठकीकडे लक्ष

काही वेळातच सोशल मिडीयावर चार कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला .सोशल मिडीयाचा माध्यमातून व्हिडियो पोलिसाच्या हाती लागताच पोलिसांनी या व्हिडीओ मधील तरुणाचा शोध घेतला. हा तरूण कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात राहत असल्याचे कळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावरून या तरुणाला अटक केली. प्रदीप यादव असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कोयते जप्त केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Lakar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com