Vasantrao Kale Sugar Factory Election : वसंतराव काळे साखर कारखाना निवडणूक: NCP त पडली माेठी फूट, शरद पवारांच्या बैठकीकडे लक्ष

आगामी काळात हाेणा-या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार काय निर्णय देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Pandharpur, Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana, NCP
Pandharpur, Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana, NCPPandharpur
Published On

Sahakar Shiromani Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana Election : वसंतराव काळे साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात कल्याणराव काळे (kalyanrao kale) गट विराेधात दिपक पवार (deepak pawar) गट एकमेंकासमाेर उभे ठाकले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (ncp) गाेटात फूट पडल्याची जाेरदार चर्चा साेलापूर (solapur) जिल्ह्यात सुरु झाली आहे. (Maharashtra News)

Pandharpur, Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana, NCP
Kolhapur Crime News : रुईकर कॉलनीतील बंगल्यात दराेडा, 20 ताेळे साेन्यासह राेकड लूटली; काेल्हापूर पोलीसांचा तपास सुरु

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. या कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी शक्तीप्रदर्शन करत मंगळवारी (ता. 16) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली हाेती.

या रॅलीत ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते व सभासद सहभागी झाले होते. काळे यांच्या विरोधात नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर काळे यांनी ही शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन नेते आमने सामने येणार आहेत.

Pandharpur, Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana, NCP
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

दरम्यान वसंतराव काळे साखर कारखाना निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दिपक पवार यांनी पॅनल तयार केले आहे. आज पवार यांच्या पॅनलकडून 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीत फूट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Pandharpur, Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana, NCP
बेधुंद तू बेछूट मी... 36 Nakhrewali.., पत्रकारांना मारहाण करणारे पाच जण पाेलीसांच्या ताब्यात, Gautami Patil कार्यक्रमाचे आयाेजकही अडचणीत (पाहा व्हिडिओ)

सत्ताधारी काळे गटाच्या विराेधात जवळपास 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यंदा मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूकीत रंगत निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमध्येच लढत होत असल्याने या निवडणुकीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या पाच जूनपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar latest news) यांच्या समवेत सर्व पदाधिका-यांची बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीत काेणता निर्णय हाेणार याची उत्सुकता सभासदांना लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com