संजय गडदे
Mumbai News : मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी परिसरात देखील एक चोरीची घटना उघडकीस आली. रात्रीच्या वेळी दोघेजण डेली नीड्स सुपर मार्केटमधील दुकानाचा आईस्क्रीमने भरलेला डीप फ्रीजर टेम्पोमध्ये टाकून चोरी करून पळाले.
या संदर्भात गुन्हा दाखल होताच एमएसबी कॉलनी पोलिसांनी दोन आरोपींना अवघ्यातील तासात अटक करून चोरी गेलेला आईस्क्रीमने भरलेला फ्रीज देखील हस्तगत केला आहे. फ्रिज आणि मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 1 लाख 44 हजार इतकी आहे. ओमाराम देवाराम रबारीयो (24 वर्ष) व वोताराम भवरलाल मेगवाल (25 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी भागातील डेली न्यूज सुपर मार्केट या दुकानात असलेला डीप फ्रिजर चोरी झाल्याबाबतची तक्रार दुकानाचे मालक जयेश राघू पटेल यांनी स्वतः: पोलीस ठाण्यात येऊन दिली. यांच्या या तक्रारीवरून कलम 379 भादंवीनुसार अज्ञात आणि विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Crime News)
गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पो.उ.नि. अखिलेश बोंबे, पो.उ.नि संदीप गोरडे, पो. ह. प्रवीण जोपळे पो.ह.संदीप परीट,पो.शि.अर्जुन आहेर पो.शि.गणेश शेरमाळे हे पथक हे घटनास्थळी पोहोचून दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये तीन अनोळखी व्यक्ती पिकअप मधून फ्रिजची चोरी करून घेऊन जाताना दिसले.
सीसीटीव्हीमध्ये आढळून आलेल्या पिक अपच्या नंबरवरून टेम्पो चालकास वसई येथून अटक करण्यात आली. चौकशी केली असता पोर्टर या ऑनलाइन ॲपद्वारे त्यास हे फ्रिज घेऊन जाण्याचे भाडे मिळाले होते. म्हणून तो या ठिकाणी आला होता व फ्रिज उचलण्यास मदत करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
पोलिसांनी टेम्पो चालकाकडून आरोपींचा मोबाईल नंबर घेऊन त्याचे लोकेशन ट्रॅक करून त्या दोन्ही आरोपींना नालासोपारा येथून अटक करून त्यांच्याकडून चोरी झालेला डीप फ्रिजर हस्तगत केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.