Mumbai Airport: बॅगेत बॉम्ब असल्याचं महिलेनं सांगितलं, अख्ख्या एअरपोर्टवर उडाला गोंधळ; आता आली पश्चातापाची वेळ
सचिन गाड, मुंबई
Mumbai News: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) बॅग चेक इन दरम्यान एका महिलेने बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. यामुळे पोलिसांची एकच धांदल उडाली. पण महिलेने बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली. या महिलेला बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगणं महागात पडलं आहे. तिला सहारा पोलिसांनी (Sahar Police) अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर बॅग चेक इन दरम्यान रुची शर्मा नावाच्या एका महिला प्रवाशाने बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. चेक इन दरम्यान बोर्डिंग पास घेत असताना या महिलेने ही माहिती सांगितली. त्यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. बॉम्ब असल्याचे कळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर श्वान पथकाला बोलावून बॅगेची तपासणी करण्यात आली. यावेळी बॅगेत बॉम्ब नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेविरोधात कारवाई केली.
बॅगेत बॉम्ब असल्याची धमकीवजा खोटी माहिती देऊन मुंबई विमानतळावरील सार्वजनिक शांततेचा भंग करून भीतीदायक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सहारा पोलिसांनी या महिलेला अटक केली. या महिलेविरोधात पोलिसांनी भा दं वि कलम 336 आणि 505 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. एका दिवसातच पोलिसांनी महिलेविरोधात आरोपपत्र दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डोमेस्टिक प्रवासात 15 किलो अधिकतम वजनाची एकच बॅग घेऊन जायची परवानगी असताना रुची शर्माकडे एकूण 22 किलो वजनाच्या दोन बॅगा होत्या. जास्तीचे चार्जेस भरण्यास रुची शर्माने नकार दिला होता. त्यामुळे विमानतळावर वाद झाला होता. त्यामुळे तिने बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. तिच्या या अफवेमुळे एकच गोंधळ उडाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.