MS Dhoni News : धोनीचा अवघ्या 7 सेकंदाचा Unseen Video व्हायरल, व्हिडीओ पाहून फॅन्सचे डोळे पाणावले

MS Dhoni Viral Video : व्हिडिओमध्ये धोनी ड्रेसिंग रुममध्ये एकटाच बसला आहे.
MS Dhoni
MS DhoniSaam TV
Published On

MS Dhoni Viral Video : महेंद्र सिंह धोनीच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांचे फॅन्स चिंतेत आहेत. धोनी पुढची आयपीएल खेळेल की नाही याबाबतची प्रश्नचिन्ह आहे. धोनीला त्याच्या निवृत्तीबाबत सातत्याने प्रश्न विचारले जातात. मात्र आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर निवृत्तीच्या बाबत विचार करायला माझ्याकडे 9-10 महिने आहेत, असं धोनीने म्हटलं.

आयपीएलचा 16 वा हंगाम सुरु होण्याआधीपासून धोनी गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत होता. धोनी दुखापतीमुळे यंदाचं आयपीएल खेळेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र धोनी यंदाचं आयपीएल खेळला आणि संघाला पाचव्यांदा चॅम्पियन देखील केलं.

 चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा अंतिम सामन्यात पराभव करत जेतेपरदावर नाव कोरलं. चेन्नई आणि धोनीच्या फॅन्सचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र धोनीचा एक व्हिडीओ समोर आल्याने त्याचे फॅन्स टेन्शनमध्ये आले आहेत.

MS Dhoni
Ravindra Jadeja Gifts His Bat: मोठ्या मनाचा जडेजा! ज्या बॅटने CSK ला मिळवून दिला विजय, तीच बॅट केली गिफ्ट

धोनीचा व्हायरल झालेला व्हिडीओ अवघ्या 7 सेकंदाचा आहे. व्हिडिओमध्ये सामन्यादरम्यान धोनी ड्रेसिंग रुममध्ये एकटाच बसला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनी त्रस्त असल्याचं दिसतंय. मैदानात उतरण्याआधी तो त्याच्या गुडघ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कट्टर फॅन्सना प्रचंड वेदना होत आहेत. त्याच्या चाहत्यांनी धोनाला काळजी घेण्याचं आवाहन केलं. (Latest sports updates)

MS Dhoni
Ruturaj Gaikwad's Wife: गायकवाडांची होणारी सून नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल सर्व काही

सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. विश्वनाथन यांनी म्हटलं की धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे हे खरे आहे. धोनी या दुखापतीसाठी वैद्यकीय सल्ला घेतला जाईल, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com